प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या बरोबर भविष्यवाणी, ज्योतिष भाकीते यांना राजकीय क्षेत्रात उत आला आहे. महाराष्ट्रात काय होईल हे सांगण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातून भाजपचे सरकार जाईल आणि समाजवादी पक्षाचे सरकार येईल, असे भाकीत केले आहे.Jitendra Awhad’s belief in parrot prediction
यावरून भाजप आणि राष्ट्रवादी – शिवसेना यांच नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोपटाच्या भविष्यवाणीवर “विश्वास” दाखवत भाजपचे उत्तर प्रदेशातले बहुजन समाजाचे आमदार काय करणार हे या पोपटाने दाखवून दिले आहे, असे ट्विट केले आहे.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती 😄. pic.twitter.com/V6k584cvUK — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2022
उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती 😄. pic.twitter.com/V6k584cvUK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2022
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका पोपटा बरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे. गुजरात मध्ये मुकेश अंबानी यांच्या कंपनीने विकसित केलेल्या प्राणिसंग्रहालयातला हा व्हिडिओ आहे. मोदी पोपटाला आपल्या हातावर घेण्याचा प्रयत्न करतात परंतु पोपट त्यांच्यापासून दूर जात आहे असा हा व्हिडिओ आहे आणि पोपटाने ही “भविष्यवाणी” केल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
शरद पवार आणि संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीबद्दल राजकीय भाकित केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी हे दोन मोठे भविष्यवेत्ते महाराष्ट्रात काय होणार हे सांगण्यापेक्षा उत्तर प्रदेशातले भाकीत वर्तवता आहेत. त्यापेक्षा संजय राऊत यांनी शरद पवार पंतप्रधान कधी होणार हे सांगावे आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर कधी पडणार हे सांगावे, असे खोचक सवाल करणारी ट्विट केली होती. त्यावर संजय राऊत यांनी आज सकाळी प्रत्युत्तर दिले आहे. तर दुपारी पोपटाचा व्हिडिओ सादर करत शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App