बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी ब्राह्मणांना शिवीगाळ केल्याबद्दल माफी मागितली असली तरी सध्या तरी हे प्रकरण शांत झालेले नाही. सोमवारी बिहारमधील कोर्ट आणि पोलस ठाण्यात जीतन राम मांझी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रकरणी बिहारचे भाजप नेते गजेंद्र झा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मांझी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, जो ब्राह्मणाचा मुलगा मांझीची जीभ कापून आणेल त्याला मी 11 लाख रुपये देईन. Jitan Ram Manjhi controversy BJP leader Announced 11 lakh reward to person who cut off tongue of Ex CM Manjhi
वृत्तसंस्था
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी ब्राह्मणांना शिवीगाळ केल्याबद्दल माफी मागितली असली तरी सध्या तरी हे प्रकरण शांत झालेले नाही. सोमवारी बिहारमधील कोर्ट आणि पोलस ठाण्यात जीतन राम मांझी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रकरणी बिहारचे भाजप नेते गजेंद्र झा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मांझी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, जो ब्राह्मणाचा मुलगा मांझीची जीभ कापून आणेल त्याला मी 11 लाख रुपये देईन.
जीतनराम मांझी यांची जीभ कापण्याची घोषणा भाजप नेत्याकडून हाताच मांझी यांच्या पक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चानेही प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान म्हणाले की, जीतन राम मांझी यांच्यावर भाजप नेत्यांकडून सातत्याने अशोभनीय टिप्पणी केली जात आहे. गजेंद्र झा यांनी जीतन मांझी यांची जीभ कापण्याची भाषा केली आहे. ही बाब दलितांचा अपमान करणारी नाही का?
ते म्हणाले की, मी बिहार भाजपच्या प्रमुख नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या लोकांना समजावून सांगावे की हे सर्व योग्य नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या विरोधात पाटणा आणि पूर्णिया येथे सोमवारी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या. पाटण्यामध्ये विशाल कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण समाजाच्या लोकांनी राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला.
जीतनराम मांझी यांनी सत्यनारायण पूजेविरोधात केलेल्या वक्तव्याचा उद्देश हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा असल्याचा आरोप झाला. याशिवाय ब्राह्मण समाजासाठीही त्यांनी अपशब्द वापरले. मांझी यांच्या वक्तव्यामुळे समाजात मतभेद निर्माण होतात. अशी विधाने जातीवादाला प्रोत्साहन देतात आणि समाजात दुही माजवतात. त्यांच्या या अवमानकारक विधानामुळे दोन जातींमध्ये दंगली घडविण्याची शक्यता आहे, असाही आरोप विरोधकांनी केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App