जेफ बेझोस ‘ॲमेझॉन’मधून निवृत्त, अँडी जेस्सी यांच्याकडे जबाबदारी

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (वय ५७) हे ॲमेझॉन या बलाढ्य ऑनलाइन विक्री कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरुन पायउतार झाले. Jef Bozes retired

बेझोस यांनी २७ वर्षांपूर्वी म्हणजे ५ जुलै १९९४ रोजी ‘ॲमेझॉन’ची स्थापना केली होती. त्याच दिवशी त्यांनी ‘सीईओ’पद सोडले असले तरी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीशी त्यांचे नाते कायम राहणार आहे. आता ते नवी उत्पादने व नव्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. ब्लू ओरिजिन ही रॉकेट कंपनी आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राची जबाबदारी पेलण्यास ते सज्ज झाले आहेत.

त्यांची जागा अँडी जेस्सी घेणार आहेत. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ते २० वर्षांपासून ‘सीईओ’ होते. बेझोस यांच्यानंतर जेस्सी हे ॲमेझॉनचे दुसरेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुढील दहा वर्षे त्यांना २० कोटी डॉलर जादा वेतन देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.

Jef Bozes retired

महत्त्वाच्या बातम्या