जयाजी हे वागणं बरं नव्हं …!


  • पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचारार्थ समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

  • या व्हिडिओत रोड शो दरम्यान जया बच्चनने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडणाऱ्या एका चाहत्याला रागाच्या भरात थेट ढकलून दिले.

  • जया बच्चन टीएमसीच्या प्रचारासाठी बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर ओपन जीप मध्ये हा प्रकार घडला. त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Jaya Bachchan shoves fan trying to take selfie during her Howrah roadshow; video goes viral

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन बुधवारी हावडा आणि शिवपूरमध्ये रोड शो करत होत्या. यावेळी त्यांच्या एका चाहत्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावर जया बच्चन इतक्या रागावल्या की त्यांनी त्याला थेट ढकलले.आणि तो चाहता पडला.

जया बच्चनचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर बरेच लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.

जया बच्चन ह्या अमिताभ यांच्या पत्नी, स्वतः एक अभिनेत्री, एका पक्षाच्या प्रतिनिधी, खासदार, अभिषेकच्या आई अन् विश्व सुंदरीच्या सासूबाई असताना हे वागणं योग्य नसल्याने समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

सपाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन चार दिवसासाठी पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमुलचा प्रचार करत आहेत.आता त्यांच्या अशा वागण्याने ममता दिदींना फायदा होणार की तोटा ये तो वक्त ही बतायेगा !

गुरुवारी त्या एका मोकळ्या जीपमध्ये हावडा व शिवपूर येथे प्रचार करत होत्या. या दरम्यान टीएमसी समर्थकांव्यतिरिक्त जयाचे अनेक चाहतेही या रॅलीला उपस्थित होते. बर्याच चाहत्यांनी जयांबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्नही केला. अशाच एका समर्थकाने जीपवर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, यामुळे त्यांना भयंकर राग आला.चक्क त्यांनी चाहत्याला ढकलले आणि तो खाली पडला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर बर्‍याच वापरकर्त्यांनी जयाच्या या वागण्यावर टीका केली असून त्यांना अहंकारी म्हटले आहे.आता आपण इतकंच म्हणू शकतो की जयाजी हे वागणं बरं नव्हं …!

Jaya Bachchan shoves fan trying to take selfie during her Howrah roadshow; video goes viral

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण