वृत्तसंस्था
नगर : एकीकडे दहशतवादी काश्मीमधल्या हिंदूंना आणि परप्रांतीयांना टार्गेट करीत असताना जम्मू – काश्मीर केंद्र शासित प्रशासनाने विकासाची वाट सोडलेली दिसत नाही. काश्मीरमध्ये हिंसाचार माजवूनही दहशतवाद्यांना विकासाचा रथ रोखता येणार नाही, असाच राजकीय संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. Jammu and Kashmir administration signs an MoU with Govt of Dubai for real estate development, industrial parks, IT towers, multipurpose towers, logistics, medical college, super speciality hospital and more: LG Manoj Sinha
जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन आणि दुबई सरकार यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून या प्रकल्पांमध्ये दुबई सरकार गुंतवणूक करणार आहे.
Jammu and Kashmir administration signs an MoU with Govt of Dubai for real estate development, industrial parks, IT towers, multipurpose towers, logistics, medical college, super speciality hospital and more: LG Manoj Sinha pic.twitter.com/7qXWkXRQ7G — ANI (@ANI) October 18, 2021
Jammu and Kashmir administration signs an MoU with Govt of Dubai for real estate development, industrial parks, IT towers, multipurpose towers, logistics, medical college, super speciality hospital and more: LG Manoj Sinha pic.twitter.com/7qXWkXRQ7G
— ANI (@ANI) October 18, 2021
या प्रकल्पांमध्ये गृह निर्माण, इंडस्ट्रीअल पार्क्स, आय टॉवर, मल्टिपर्पज टॉवर, मेडिकल कॉलेज, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि अन्य सुविधा बांधणीचा समावेश आहे. या प्रकल्पांचे आराखडे जम्मू – काश्मीर केंद्र शासित प्रशासन तयार करेल. त्यामध्ये गुंतवणूक दुबई सरकारची असेल. तसेच भारतीय अधिकारी आणि कामगारांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्यपाल मनोज सिन्हा आणि दुबईच्या राजदूतांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर आज श्रीनगरमध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App