जयप्रकाश नारायण विद्यापीठातून त्यांच्यावरीलच पाठच वगळला, लोकमान्य टिळक, राम मनोहर लोहिया, सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील धडेही वगळले


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमधील छपरा येथील जयप्रकाश नारायण (जेपी) विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमातून जय प्रकाश नारायण आणि समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यावरील पाठ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या नावावरच विद्यापीठाचे नाव आहे. याशिवाय लोकमान्य टिळक, राम मनोहर लोहिया, सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील पाठही वगळले आहेत.Jaiprakash Narayan skipped lessons on Jaiprakash Narayan, Lokmanya Tilak, Ram Manohar Lohia, Subhash Chandra Bose, Mahatma Jyotiba Phule.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासारखे नेते जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनातूनच पुढे आले. दोघेही याच विद्यापीठात शिकले आहेत. हे पाठ वगळल्याने विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर कुलगुरू फारुक अली यांनी दोन महिन्यांत सुरू होणाºया नवीन शैक्षणिक सत्रात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.एका ट्विटमध्ये लालूप्रसाद यादव यांनी स्वातंत्र्यलढ्यातील योध्यांची नावे वगळल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी 30 वर्षांपूर्वी माझ्या कर्मभूमीवर जेपीयूची स्थापना केली होती. हे नाव जय प्रकाशजींच्या नावावरून ठेवण्यात आले.

आता आरएसएसने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) बिहार सरकारला पाठिंबा दिला आहे. आरएसएसच्या मानसिकतेने जेपी-लोहियासारख्या महान समाजवादी नेत्यांचे विचार विद्यापीठातून काढून टाकले. हे सहन केले जाऊ शकत नाही. सरकारने त्याची त्वरित दखल घेतली पाहिजे.

कुलगुरू अली यांनी सांगितले की, राज्यपालांनी त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली. निवड-आधारित क्रेडिट प्रणालीच्या (सीबीसीएस) अंमलबजावणीमध्ये विलंब झाल्यामुळे सुरुवातीला ते प्रलंबित ठेवले गेले.

बिहारमधील सर्व विद्यापीठांनी 2018 पर्यंत त्याचे पालन केले. मी सप्टेंबर 2020 मध्ये येथे आलो आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सीबीसीएस लागू करावा अशी माझी इच्छा होती. मला सांगण्यात आले की अभ्यासक्रम तयार आहे. दोन वर्ष परीक्षाच झाल्या नसल्याने वेळ शिल्लक नव्हता. त्यामुळे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी झाली.

अली म्हणाले, संस्थेचे नावच जयप्रकाश नारायण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील पाठ वगळण्याचे कोणतेही कारण नव्हते. खरे तर जयप्रकाश नारायण यांच्यावर एक स्वतंत्र पेपर असू शकतो. 2018 आणि 2019 च्या अनुशेष परीक्षा संपल्यानंतर, आम्ही काही महिन्यांत सुरू होणाºया पुढील सत्रापासून आवश्यक बदल घडवून आणू.

अभ्यासक्रमातून वगळलेल्या इतरांमध्ये दयानंद सरस्वती, राजा राम मोहन राय, बाळ गंगाधर टिळक, पंडित दीन दयाल उपाध्याय, सुभाषचंद्र बोस आणि ज्योतिबा फुले यांचाही समावेश आहे. बिहारचे शिक्षण मंत्री विजयकुमार चौधरी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (शिक्षण) संजयकुमार यांनी यासंदर्भात कुलगुरुंशी चर्चा केली आहे.

उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष कामेश्वर झा म्हणाले की, अभ्यासक्रम तपासल्याशिवाय विद्यापीठाने बदलण्याचा निर्णय घेणे योग्य नव्हते. कुलगुरू अली यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.

Jaiprakash Narayan skipped lessons on Jaiprakash Narayan, Lokmanya Tilak, Ram Manohar Lohia, Subhash Chandra Bose, Mahatma Jyotiba Phule.

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण