‘जहा व्होट, वही वैक्सिनेशन’, दिल्ली सरकारची घोषणा; घरोघरी लसीकरण करण्याचा निर्धार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “दिल्ली सरकार आजपासून ‘जहा व्होट, वही वैक्सिनेशन’ (ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाणार) कार्यक्रम सुरू करत आहे. ‘Jahan Vote, Wahan Vaccination’ campaign from today : Arvind kejriwal

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली. या कार्यक्रमातंर्गत ज्या मतदार केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाईल, त्यामुळे लस घेण्यासाठी त्या मतदान केंद्रावरच जावे, अशी माहिती लोकांना दिली जाणार आहे.

राज्यात कोरोनाच्या थैमानामुळे सरकार हादरले असून आता धोका टाळण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात केली जाणार आहे. पुढील चार आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाईल, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

कोरोनाच्या चौथ्या लाटेनं दिल्लीत भयावर परिस्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांच्या टंचाईमुळे दिल्लीत प्रचंड मनुष्यहानी झाली. महिनाभर दिल्ली सरकार आणि प्रशासनाची चौथ्या लाटेनं झोप उडवली होती. ऑक्सिजन पुरवठा आणि संसर्गाचा वेग कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, दिल्ली सरकारने आता नागरिकांची फरफट थांबवून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे.

हेही वाचा – ‘घर घर राशन’ योजनेच्या स्थगितीवरून भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती