योगी दिल्लीत आल्याबरोबर सौजन्याच्या गाठीभेटींचा राजकीय सिलसिला तेज


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ राजधानीत दाखल होताच सौजन्य गाठीभेटींचा सिलसिला तेजीत आला आहे. योगींनी आज दिल्लीत दाखल झाल्या – झाल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. It was a courtesy meeting with Uttar Pradesh CM Yogi Adityanath in Delhi today after joining Bharatiya Janata Party: Jitin Prasada

ही भेट आटोपून योगी उत्तर प्रदेश भवनात दाखल होताच भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले काँग्रेसचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी योगींची भेट घेतली. योगीजी दिल्लीत आल्यामुळे आपण त्यांची सौजन्य भेट घेतल्याचे जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेश भवनातून बाहेर पडताना सांगितले.

इकडे योगी – जितीन प्रसाद यांची भेट होत असतानाच उत्तर प्रदेशातील अपना दल पक्षाच्या नेत्या अनुप्रिया पटेल या गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. अमित शहांची भेट घेऊन चर्चा केल्याचा फोटो अनुप्रियांनी ट्विट केला.

उत्तर प्रदेश भाजपमध्ये असलेली कथित अस्वस्थता, मोदी विरूध्द योगी असे चालविण्यात आलेले ट्विटर वॉर, योगी मंत्रिमंडळातला संभाव्य फेरबदल आणि विस्तार तसेच राज्यात २०२२ च्या सुरूवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणूका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सौजन्यपूर्ण गाठीभेंटीना राजकीय महत्त्व आले आहे.

उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांनी अद्याप आपापली राजकीय समीकरणे जुळवायला सुरूवात करण्यापूर्वी भाजप स्वतःची राजकीय समीकरणे जुळवायला लागला असल्याचे या गाठीभेटींमधून दिसून येते आहे आणि यामध्ये सुरूवातीपासूनच अमित शहा लक्ष घालायला लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.

It was a courtesy meeting with Uttar Pradesh CM Yogi Adityanath in Delhi today after joining Bharatiya Janata Party: Jitin Prasada

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण