Covid Vaccine : कोरोना साथीने जगातील देशांनी एकमेकांना मदत करण्याची आणि एकत्रितपणे संकटाला तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे. यानुसार, इस्रायलने पॅलेस्टाईनला कोट्यावधी कोविड लसी देण्याचे म्हटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शत्रुत्व खूप जुने आहे. गत महिन्यातही दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता, परंतु या संकटाच्या काळात इस्रायलने पॅलेस्टाईनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. israel to provide million covid vaccine doses to palestinians
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना साथीने जगातील देशांनी एकमेकांना मदत करण्याची आणि एकत्रितपणे संकटाला तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे. यानुसार, इस्रायलने पॅलेस्टाईनला कोट्यावधी कोविड लसी देण्याचे म्हटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शत्रुत्व खूप जुने आहे. गत महिन्यातही दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता, परंतु या संकटाच्या काळात इस्रायलने पॅलेस्टाईनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इस्रायलने यापूर्वीच आपल्या प्रौढ लोकसंख्येच्या 80 टक्के लोकांचे लसीकरण केले आहे. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
1948 पूर्वी पॅलेस्टाइनचा भूगोल वेगळा होता. तरीही तेथे काही ज्यू निर्वासित राहत होते. पण त्यावेळी पॅलेस्टाईनवर पॅलेस्टाईनचा 100 टक्के कब्जा होता. त्यावेळी इस्रायलचे नावही नव्हते. 1948 मध्ये ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनचे दोन तुकडे केले. 55 टक्के जमीन पॅलेस्टाईनच्या भागात आणि 45 टक्के इस्रायलच्या भागात आली. यानंतर 14 मे 1948 रोजी इस्रायलने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आणि अशा प्रकारे जगात प्रथमच ज्यू देशाचा जन्म झाला.
पण जेरुसलेमचा लढा अजूनही सुरूच होता. कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही जेरुसलेमला आपली राजधानी बनवायचे होते. धार्मिक दृष्टिकोनातूनदेखील जेरूसलेम केवळ मुस्लिम आणि ज्यूच नाही, तर ख्रिश्चनांसाठीसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्र मध्ये आले आणि त्यांनी पॅलेस्टाईनचा आणखी एक तुकडा विभक्त केला. आता जेरुसलेममधील आठ टक्के हिस्सा संयुक्त राष्ट्रांच्या नियंत्रणात आहे. तर 48% जमीन पॅलेस्टाईनमध्ये आणि 44% भूभाग इस्राईलच्या ताब्यात आहे. पण त्यानंतरही जमिनीसाठीची लढाई सुरूच आहे.
israel to provide million covid vaccine doses to palestinians
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App