IPL 2021: राजस्थान रॉयल्सचा शेवटच्या ओव्हरमध्ये दोन धावांनी थरारक विजय, कार्तिक त्यागीने घेतल्या दोन विकेट

प्रतिनिधी

दुबई: कार्तिक त्यागीने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त एक रन देऊन दोन विकेट्स घेतल्या व पंजाबने आपला हातात अालेला विजय गमावला.

IPL 2021: Rajasthan Royals won by 2 runs in thrilling last over, Kartik Tyagi took 2 wickets

पंजाबचा कर्णधार के एल राहुलने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. राजस्थाननी पंजाबसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले. मयांक अगरवाल आणि के एल राहुल या दोघांनी पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. पंजाबने सलामीसाठी शतकी   भागीदारी पूर्ण केली. तब्बल पाच वेळा आयपीएलमध्ये या दोघांनी शतकी भागीदारी रचली आहे. मयांकने ४३ चेंडूत ६७ धावा केल्या, तर केेे एल राहुलने ३३ चेंडूत ४३ धावा रचल्या.


IPL चे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; टी -20 वर्ल्डकपच्या निर्णयासाठी ICC ला जूनपर्यंत मागणार मुदत


राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल यानी ४९ तर महीपाल लोमरोर यांनी ४३ धावा केल्या. राजस्थानची सुरूवातही दमदार झाली. राजस्थानने २०० टप्पाही गाठला असता परंतु अर्शदीपच्या ५ विकेट्स आणि मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेऊन राजस्थानचा डाव १८५ धावांमध्ये संपुष्टात आणला.

पंजाबला अखेरच्या ओव्हरमध्ये चार धावांची गरज होती परंतु कार्तिक त्यागीने फक्त १ रन आणि २ विकेट्स घेऊन राजस्थानचा विजय हिरावून घेतला. राजस्थान रॉयल्स आता ८ पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आली असून, पंजाब किंग्स सहा पॉईंटसह सातव्या क्रमांकावर आले आहेत.

IPL 2021: Rajasthan Royals won by 2 runs in thrilling last over, Kartik Tyagi took 2 wickets

महत्त्वाच्या बातम्या