हैदराबादला लवकरच सुरु होणार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र, जगभरातील खटल्यांची सुनावणी होणार


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद – हैदराबादला लवकरच आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुरू होणार असल्याची माहिती सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली. या लवाद केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यास मदत मिळणार आहे. International tribune will be started in Hyderabad soon

आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे स्वप्न तीन महिन्यात पूर्ण होत असल्याचे सरन्यायाधीश रमणा म्हणाले. इतक्या लवकर लवाद केंद्र कार्यान्वित होईल असे वाटले नव्हते, परंतु याबद्दल राज्य सरकारचे आपण आभार मानतो. लवाद केंद्र सुरू होणे हे हैदराबाद आणि तेलंगण राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरेल. या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय वादांवर निपटारा केला जाणार नाही तर देशांतर्गत खटले देखील सोडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

या वेळी सरन्यायाधीश रमणा यांनी न्यायाधीश हिमा कोहली यांना लवाद केंद्रासंदर्भात योग्य खबरदारी घेण्याचे आणि गरजेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश रमणा यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचेही आभार मानले. या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आणि आवश्यरक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. या लवाद केंद्रामुळे व्यावसायिक वाद मिळवण्यासाठी परदेशात दौरे करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

International tribune will be started in Hyderabad soon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती