विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारे जहाज लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आयएनएस ध्रुव हे जहाज शत्रूच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारे भारताचे पहिले जहाज आहे.INS Dhruv ship to track nuclear-capable missiles
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल १० सप्टेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये उपग्रह आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारे पहिले जहाज ताफ्यात आणण्याची तयारी केली आहे. हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या सहकायार्ने निर्मिती करण्यात आलेल्या आयएनएस ध्रुवमध्ये शत्रूच्या टेहळणी उपग्रह आणि अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे.
आयएनएस ध्रुवच्या लॉंच दरम्यान नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमानासह डीआरडीओ आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे जहाज भारतीय नौदलाच्या जवानांसह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) द्वारे नियंत्रित केले जाईल. आतापर्यंत अशी जहाजं फक्त फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीनद्वारे चालवली गेली आहे. आता या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.
१०,००० टन वजनाचे हे जहाज भारतीय शहरे आणि लष्करी तळांजवळ येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांबाबत लवकर इशारा देणारी यंत्रणा म्हणून काम करेल आणि ते त्या हल्ल्याचा प्रतिकार करेल. आण्विक हल्यांना रोखण्याचीही त्याची क्षमता आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. भारतासोबत असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस ध्रुवचं महत्त्व आणखी वाढणार आहें.
चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताच्या सागरी सुरक्षा जाळ्यासाठी आयएनएस ध्रुव हे मोठी ताकद ठरेल. आयएनएस ध्रुव डीआरडीओने विकसित केलेले अत्याधुनिक अॅक्टिव्ह स्कॅन अॅरे रडार किंवा एईएसएने सुसज्ज आहे. जे आजच्या जगात खूप प्रगत मानलं जातं.
मलाका, सुंदा, लोम्बोक, ओम्बाई आणि वेटार सामुद्रधुनीमार्गे दक्षिण चीन समुद्रात प्रवेश करण्याच्या मार्गांपर्यंत अदनच्या आखातापासून या प्रदेशावर लक्ष ठेवण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेत यामुळे भर पडेल.
हिंदी महासागराच्या तळाशी मॅपिंग करून, आयएनएस ध्रुव भारतीय नौदलाला उप -पृष्ठभाग, पृष्ठभाग आणि हवाई या तिन्ही परिमाणांमध्ये अधिक चांगल्या लष्करी कारवायांची योजना आखण्यास मदत करेल. चीन लांब पल्ल्याच्या विमानवाहू नौका, युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवत असताना हे नवीन भारतीय जहाज गुप्तचर संस्था एनटीआरओला मोठी मदत करेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App