विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेश सीमालगतच्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिघडत चालल्याने भारतासमवेतच्या सीमाबंदीत ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. बांगलादेश अंतर्गत मंत्रालयाच्या १३ जूनच्या बैठकीत सीमाबंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.Indo – Bangladesh borders sealed
कोरोनामुळे बांगलादेशात सध्या निर्बंध कडक करण्यात आले आहेत. परंतु पात्र पासपोर्टधारक बांगलादेशी नागरिकांना मायदेशी येण्याची मुभा दिली असून घरी परतल्यावर चौदा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
याशिवाय बांगलादेशमध्ये मृतांची संख्या वाढत चालली असून रविवारी विक्रमी नोंद झाली. रविवारी चोवीस तासात ४७ जणांचा मृत्यू झाला आणि जून महिन्यांतील सर्वात मोठा आकडा आहे. याशिवाय २४३६ जण नव्याने रुग्ण आढळून आले. देशात डेल्टा व्हेरियंटचे विषाणू असल्याचे आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे.
यापूर्वी बांगलादेशने एप्रिल महिन्यात भारतालगतच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यानंतर या बंदीत दोनदा वाढ करण्यात आली. सुरवातीला ८ मे आणि दुसऱ्यांदा २९ मे रोजी मुदतवाढ दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App