कॅनडात इंदिरा गांधीच्या हत्येचा प्रसंग दर्शवणारी रॅली; सोशल मीडियावर व्हिडीओ अन् फोटो व्हायरल!

Canada

या रॅलीत ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलीचे बॅनरही होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग दर्शवणारी रॅली काढण्यात आली. त्यात दोन शीख बंदुकधारी  जवान भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचे दाखवले गेले. या रॅलीत ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलीचे बॅनरही होते. Indira Gandhis assassination rally in Canada Videos and photos viral on social media

4 जून रोजी खलिस्तानी समर्थकांनी जवळपास पाच किलोमीटर पर्यंत ही रॅली शहरातून काढली. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त 6 जून रोजी या रॅलीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले.

या रॅलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॅनडातच याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. सोशल मीडीयावर या रॅलीचा व्हिडीओ अपलोड करून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याचे अभियान सुरू झाले आहे.

तर, भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणार्‍या कॅनडातील एका कार्यक्रमाच्या वृत्ताने मी स्तब्ध झालो आहे. कॅनडामध्ये द्वेषाला किंवा हिंसेला कोणतेही स्थान नाही. मी या कृत्याचा स्पष्टपणे निषेध करतो.” अशी प्रतिक्रिया कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.

Indira Gandhis assassination rally in Canada Videos and photos viral on social media

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात