भारतातील लसीकरण मोहिमेने ओलांडला ९० कोटींचा टप्पा, कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज ९० कोटी लसींचे डोस देण्याचा मोठा टप्पा पूर्ण केला. यामुळे भविष्यात लसीकरणाची गती अशीच कायम ठेवली तर भारतात लसीकरण मोहीम लवकरच पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. India’s vaccination drive crosses 90 crore mark, strengthens fight against covid

‘सर्वांना लस-सर्वांना मोफत लस’ मोहिमेअंतर्गत  सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. लसीकरणाच्या आकडेवारीने ९० कोटी डोस देण्याचा विक्रम भारताने केला आहे.आता याच भक्कम पायावर लसीकरणाची व्याप्ती वाढविली जाणार आहे.देशात कोरोनाची पहिली लाट आणि त्या पाठोपाठ दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत गेला आहे. तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विविध आरोग्य पूर्ण योजना राबविल्या. लॉकडाऊन घोषित केला. तसेच लसीकरण मोहीम राबविली. त्या अंतर्गत कोव्हिशिल्ड, कोव्हेक्सींन लसी मोठ्या प्रमाणात मोफत जनतेला दिल्या. या शिवाय अन्य परदेशी लसी उपलब्ध आहेत. देशात केंद्र सरकारने लासीकरण मोहीम वेगाने हाती घेतली. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवीणे अधिक सोपे झाले आहे.

‘जय अनुसंधान ‘ आणि लस निर्मिती

देशाने ९० कोटी डोस देण्याचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे.ट्विटमध्ये ते म्हणतात, लाल बहाद्दूर शास्त्री यांनी ‘ जय जवान जय किसान ‘हा नारा दिला. अटल बिहारी वाजपेयी यांनी यात ‘जय विज्ञान’ हा शब्द जोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय अनुसंधान’ असा शब्द जोडला. आता त्याच अनुसंधान अर्थात संशोधनामुळेच देशाला कोरोनाविरोधी लस प्राप्त होत आहे.

India’s vaccination drive crosses 90 crore mark, strengthens fight against covid

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण