वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वजण वाट पाहत होते. 95वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ने भव्य उद्घाटनानंतर टीव्ही आणि सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स पोहोचले आहेत. दीपिका पदुकोणदेखील ऑस्कर 2023 मध्ये सुप्रसिद्ध हॉलीवूड स्टार्समध्ये चार चाँद लावताना दिसत आहे. दीपिका यावर्षी प्रेझेंटर म्हणून या सोहळ्याचा भाग बनली आहे.India’s Rocks at Oscars, ‘The Elephant Whispers’ makes history, Best Short Documentary Award
The Oscar for Best Documentary Short Film goes to 'The Elephant Whisperers' #Oscars #Oscars95 pic.twitter.com/jLG0aqAg3j — The Academy (@TheAcademy) March 13, 2023
The Oscar for Best Documentary Short Film goes to 'The Elephant Whisperers' #Oscars #Oscars95 pic.twitter.com/jLG0aqAg3j
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
भारतातील शॉर्ट डॉक्युमेंट्री द एलिफंट व्हिस्पर्सने ऑस्कर 2023 जिंकून इतिहास रचला आहे. निर्माते गुनीत मोंगा यांच्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले जात आहे. याशिवाय RRR हा भारतीय चित्रपट इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बेस्ट ओरिजनल साँगच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या श्रेणीत नामांकन मिळवणारा RRR हा पहिला भारतीय चित्रपट आहे. चाहत्यांनी त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Cptjht3ooe0/?utm_source=ig_web_copy_link
सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका एलिझाबेथ बँक्स यांनी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार विनोदी पद्धतीने सादर केला. अवतार: द वे ऑफ वॉटर या चित्रपटाने हा पुरस्कार जिंकला. पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या या चित्रपटाच्या टीमला आपले भाषण पूर्ण करू दिले गेले नाही. यामुळे सर्वजण खूप निराश दिसत होते.
ऑस्कर जिंकल्यावर गुनीत मोंगा काय म्हणाले?
द एलिफंट व्हिस्पर्स या शॉर्ट डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल निर्माते गुनीत मोंगा यांनी आनंद व्यक्त केला आहे. या श्रेणीत देण्यात आलेला हा भारताचा पहिला ऑस्कर आहे. सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करत गुनीत यांनी महिलांना स्वप्न पाहण्याचा संदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App