विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात भारतीय शेती क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. मात्र, गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविल्यामुळे कृषि आणि कृषिपूरक क्षेत्रांचे अर्थव्यवस्थेतील योगदान २६.९ टक्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत दिली.India’s agricultural sector contributes 26.9 per cent to the economy
तोमर म्हणाले, २०१३-१४ मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान १६ लाख ९ हजार १९८ कोटी रुपये होते. २०२०-२१ मध्ये २० लाख ४० हजार ७९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकूण कृषी नियार्तीतही सतत वाढ दिसून आली आहे .
२०१३-१४ मध्ये कृषी क्षेत्राच्या निर्यातीचे मूल्य २ लाख ६२ हजार ७७८ कोटी रुपये होते. तेच २०२०-२१ मध्ये तीन लाख दहा जहार २२८ कोटी रुपये झाले आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
नवे तंत्र शेतकऱ्यांना शिकविण्यासाठी सरकारने देशात 725 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) स्थापन केली आहेत. स्थान विशिष्टता ओळखण्यासाठी शेती चाचणी करणे, सुधारित कृषी तंत्रज्ञानाने उत्पादन वाढविणे यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा निचरा करण्यासाठी असलेल्या यंत्राला अनुदान दिले जात आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना यासाठी केंद्र सरकारने १०० टक्के अनुदान सुरू केले आहे.
त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न सुटला असल्याचे तोमर यांनी सांगितले. मागील 3 वर्षात वैयक्तिक शेतक-यांना आणि रोजगार केंद्रावर देण्यात आलेल्या मशीन्सची संख्या एक लाख ५८ हजार १३५ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App