विशेष प्रतिनिधी
डेहराडून – उत्तराखंडमध्ये देवबन येथे देशातील पहिल्या क्रिप्टोगेमिक बागेचे उद्घाटन झाले. क्रिप्टोग्राममध्ये बियाण्याद्वारे न पसरणाऱ्या मूळ वनस्पतींचा समावेश होतो. त्यात, एकपेशीय वनस्पती, शेवाळे, बुरशी आदींचा समावेश आहे. Indians first criptogemic garden opens
वनाधिकाऱ्यांनी या बागेची अधिक माहिती देताना सांगितले की, क्रिप्टोग्रॅम गटातील वनस्पती प्राचीन असून जुरासिक युगापासून त्यांचे अस्तित्व आहे. या वनस्पती उत्कृष्ट जैव-सूचक आहेत. उदा. या गटातील लाइकेनसारखी वनस्पती प्रदूषित भागात उगवत नाही. हैदराबादी बिर्याणी आणि गालौटी कबाबसारख्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये चव आणण्यासाठी लाइकेन वापरले जाते. त्यामुळे, या प्रजातीचे आर्थिक मूल्य प्रचंड आहे.
शेवाळ्यांतील अनेक प्रजाती तसेच खाद्य मशरूम विविध पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. मॉस या वनस्पतीच्या अनेक प्रजातींमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात. स्थानिक रहिवाशांकडून लाइकेनचा औषध म्हणून वापर केला जातो. त्याचप्रमाणे, फर्न ही वनस्पती जड धातू शुद्ध करण्यासाठी वापरली जाते.
ही बाग तीन एकरांची असून समुद्रसपाटीपासून नऊ हजार फूट उंचीवर आहे. भारतातील हे मूळ वनस्पतींचे (क्रिप्टोगेमिक) उद्यान आहे. देवबनमध्ये या प्रकारातील वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास आहे. प्रदूषणापासून मुक्त असल्याने तसेच वनस्पतींना योग्य आर्द्रता मिळत असल्याने देवबनची निवड केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App