जाणून घ्या, कधी सुरू होणार आणि काय सुविधा असणार आहेत?
विशेष प्रतिनिधी
भारतीय रेल्वे विभागाकडून दिल्ली आणि नॉर्थ-ईस्ट दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू केली जात आहे. या भारत गौरव ट्रेनची सुरूवात २१ मार्च २०२३ पासून होईल. या डीलक्स वातानुकुलीत प्रवासी रेल्वेमध्ये बसून तुम्ही १५ दिवस ईशान्य भारतामधील सुंदर ठिकाणं पाहू शकाल. या प्रवासादरम्यान रेल्वेने प्रवास, हॉटेलमध्ये राहणे आदी बाबींचाही समावेश आहे. Indian Railways to launch Bharat Gaurav train to North East on March 21
भारतीय रेल्वे विभागाने भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेनद्वारे भारतातील ईशान्येकडील राज्यांमधील ठिकाणं पाहाता यावीत यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेले नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी बियॉन्ड गुवाहाटी पॅकेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Meghalaya Election: कोनराड संगमा दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदी उपस्थित असणार
या विशेष ट्रेनची सुरुवात २१ मार्च २००३ रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून होणार आहे. १४ रात्री आणि १५ दिवसांच्या या प्रवासादरम्यान आसाममध्ये गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काजीरंगा, त्रिपुरामध्ये उनाकोटी, अगरतळा आणि उदयपूर, नागालँडमध्ये दीमापूर आणि कोहीमा, मेघालयमध्ये शिलाँग आणि चेरापुंजी ही ठिकाणी असणार आहेत. या संपूर्ण प्रवासात पर्यटक रेल्वेद्वारे जवळपास ५८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
Indian Railways to launch Bharat Gaurav train to North East on March 21 Read @ANI Story | https://t.co/rqLGJ6tLN7#IndianRailways #BharatGauravtrain pic.twitter.com/maPnOsCm9B — ANI Digital (@ani_digital) March 4, 2023
Indian Railways to launch Bharat Gaurav train to North East on March 21
Read @ANI Story | https://t.co/rqLGJ6tLN7#IndianRailways #BharatGauravtrain pic.twitter.com/maPnOsCm9B
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2023
विशेष सुविधांनी परिपूर्ण असणार भारत गौरव ट्रेन –
या मॉर्डन डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमध्ये दोन विशेष डायनिंग रेस्टॉरंट, एक कंटेम्परेरी किचन, कोचमध्ये शॉवर क्यूबिकल्स, सेंसर आधारित वॉशरूम फंक्शन, फूट मसाजर आणि एक मिनी लायब्रेरीसह अनेक सुविधा असणार आहेत. या ट्रेनमध्ये एसी-1 आणि एसी-2 कोच आहे. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक लॉकर्स आणि प्रत्येक कोचसाठी नियुक्त सुरक्षा गार्ड असणार आहे.
ईएमआयसाठी पेटीएएम आणि रेजरपे पेमेंट गेटवेसोबत करार –
या पर्यटक पॅकेजला जास्तीत जास्त आकर्षक आणि स्वस्त बनवण्यासाठी आयआरसीटीसीने पेटीएम आणि रेजरपे पेमेंट गेटवे बरोबर करार केला आहे. जेणेकरून हे पैसे ईएमआयद्वारेही भरता येतील. अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीची वेबसाइट irctctourism.com या संकेतस्थळ पाहू शकता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App