भारतीय रेल्वेने प्रथमच पॉड हॉटेल सुरू केले आहे. जर तुम्ही मुंबईला छोट्या बिझनेस ट्रीपला गेला किंवा लहान मुलांच्या ग्रुपला फिरायला जायचे असेल, तर हे हॉटेल राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या पॉड हॉटेलमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय येथील भाडेही अत्यंत कमी आहे.Indian Railway launched Pod hotel in Mumbai Central railway station
वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय रेल्वेने प्रथमच पॉड हॉटेल सुरू केले आहे. जर तुम्ही मुंबईला छोट्या बिझनेस ट्रीपला गेला किंवा लहान मुलांच्या ग्रुपला फिरायला जायचे असेल, तर हे हॉटेल राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या पॉड हॉटेलमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय येथील भाडेही अत्यंत कमी आहे.
मुंबईच्या मध्य रेल्वे स्थानकावर पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर रेल्वे प्रवाशाला थकवा जाणवत असेल तर तो या हॉटेलमध्ये राहू शकतो. पॉड हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील. प्रवासी पाहुणे येथे 12 ते 24 तास राहू शकतात. येथे राहण्याचे भाडे 999 रुपये ते 1999 रुपये असेल. त्याच वेळी खाजगी पॉडचे भाडे 1249 रुपयांपासून 2499 रुपयांपर्यंत असेल.
pic.twitter.com/KMwUKnQlnH — Ministry of Railways (@RailMinIndia) November 17, 2021
pic.twitter.com/KMwUKnQlnH
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 17, 2021
पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर बांधण्यात आले आहे. येथे राहण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात प्रवाशांना झोपण्यासाठी व विश्रांतीसाठी छोटे बेड बसविण्यात आले आहेत. ही खोली एखाद्या डब्यासारखी असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या अशा 48 पॉड रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये खाजगी पॉड आणि क्लासिक पॉडचा समावेश आहे. महिलांसाठी स्वतंत्र कॅप्सूल्स करण्यात आले आहेत. याशिवाय दिव्यांगांसाठी खास कॅप्सूल्स तयार करण्यात आले आहेत.
या आहेत सुविधा
या पॉड हॉटेलमध्ये पाहुण्यांना सर्व सुविधा मिळतील. उदाहरणार्थ, येथे मोफत वायफाय सुविधा असेल. याशिवाय स्वच्छ वॉशरूम, लगेज रूम, शॉवर रूम, कॉमन एरिया आदी सुविधा असतील. याशिवाय पाहण्यासाठी दूरचित्रवाणी आणि चार्जिंग पॉइंटही बसवण्यात येणार आहेत. पॉडमध्ये वाचनासाठी रीडिंग लाईटचीही व्यवस्था असेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App