विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ‘संकल्प’ मोहिमेअंतर्गत गल्फच्या आखातामध्ये दररोज सरासरी १६ भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जात आहे. नौदलाने याबाबत निवेदन जारी केले आहे. Indian nave gave security in gulf
इराण व अमेरिकेतील तणावादरम्यान ओमानच्या आखातात दोन तेलवाहू जहाजांवर तीन स्फोट झाल्यानंतर जून २०१९ मध्ये या मोहिमेला नौदलाने सुरुवात केली. तेंव्हापासून नौदलाचे हेलिकॉप्टर असलेले जहाज वायव्य अरबी समुद्र, ओमानचे आखात आणि पर्शियन आखातात सतत तैनात ठेवले आहे. त्याद्वारे, भारतीय सागरी समुदाय व व्यापारी जहाजांना मदत पुरविण्यात येते.
नौदलाने २३ युद्धनौकाही ‘संकल्प’ मोहिमेसाठी तैनात ठेवल्या आहेत. या मोहितंर्गत दररोज सरासरी १६ भारतीय व्यापारी जहाजांना विनंतीनुसार समुद्रातून सुरक्षित मार्ग काढून दिला जातो. नौदलाचे सशस्त्र पथकही यावेळी व्यापारी जहाजांवर तैनात केले जाते. भारतात ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. देशाने २०१९ – २०२० मध्ये ६६ अब्ज डॉलरचे तेल आयात केले. बहुतांश तेल याच मार्गाने देशात येते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App