विशेष प्रतिनिधी
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या बेक्स कृष्णन नावाच्या भारतीय व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. कृष्णन याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून एका दानशूर व्यक्तीने पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. Indian gets life due to one Cr. help
कृष्णन याने सप्टेंबर २०१२ मध्ये बेफामपणे गाडी चालवत मुलांच्या एका घोळक्यात घुसविली होती. यामध्ये एका सुदानी मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेबद्दल न्यायालयाने त्याला दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. ‘यूएई’च्या कायद्यानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जीवाच्या मोबदल्यात पुरेशी रक्कम पीडित कुटुंबाला दिल्यास आणि दोषी व्यक्तीला माफ करण्याची त्या कुटुंबाची इच्छा असल्यास शिक्षा माफ होऊ शकते.
कृष्णन यांच्या कुटुंबाने लुलू ग्रुपचे अध्यक्ष एम. ए. युसुफअली यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मदत करण्याची विनंती केली. युसुफअली हे अनिवासी भारतीय आहेत. त्यांनी सर्व माहिती घेत पीडित कुटुंबाशी संपर्क साधला. बऱ्याच चर्चेनंतर सुदानी कुटुंबाने पाच लाख दिऱ्हमच्या (सुमारे एक कोटी रुपये) बदल्यात माफी देण्याचे मान्य केले. कृष्णन याच्या सुटकेसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून तो लवकरच केरळकडे प्रयाण करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App