कमांड रोलसाठी भारतीय लष्कराकडून दिले जाणार विशेष प्रशिक्षण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आता हॉवित्झर तोफखाना आणि रॉकेट सिस्टम कमांडसाठी महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. कर्नल आणि त्यापुढील कमांड व नेतृत्वाच्या भूमिकांसाठी महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास लष्कराने प्रयत्नांना वेग दिला आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून पास आऊट झाल्यानंतर फ्रंटलाइन आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला कॅडेट्सचा समावेश केला जाणार आहे. Indian Army female officer operating a howitzer and handling a rocket system
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीची पासिंग आऊट परेड २९ एप्रिल रोजी चेन्नई येथे होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, “लष्कराने महिला अधिकाऱ्यांना नेतृत्वाच्या भूमिकेसाठी सक्षम करून सर्वसमावेशकतेकडे वेगाने वाटचाल करता यावी यासाठी अनेक स्तरांवर अशी श्रृंखला सुरू केली आहे.”
काय म्हणाले आर्मी ऑफिसर? –
अधिकाऱ्यांनी सांगितले की, उदाहरणार्थ एक विशेष सीनिय कमांड कोर्स अशातच महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित केला गेला होता. ज्यामुळे महिला अधिकारींनी ऑपरेशनल, इंटेलिजन्स, लॉजिस्टिक्स आणि प्रशासनिक पैलूंमध्ये कमांडच्या मजबूतीसाठी तयार करता येईल.
महिला अधिकार्यांसाठी विशेष रिक्त पदे काढली –
या वर्षाच्या सुरुवातीला, विशेष निवड मंडळाद्वारे, सैन्याने कर्नल-रँकमधील 108 महिला अधिकाऱ्यांना कमांड असाइनमेंटसाठी अनेक धोरणे शिथिल केली. अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने विशेषत: या महिला अधिकाऱ्यांसाठी 150 अतिरिक्त रिक्त जागा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे पुरुष अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर कोणताही परिणाम होत नाही.
महिला अधिकारी हॉवित्झर तोफ चालवतील –
ओटीए पासिंग आऊट परेडनंतर प्रथमच आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे हे मोठे पाऊल आहे. यात 280 पेक्षा जास्त युनिट्स आहेत जे विविध प्रकारचे हॉवित्झर तोफ, बंदुका आणि मल्टी-लाँच रॉकेट सिस्टम हाताळतात. शॉर्ट-सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकारी म्हणून केवळ 10-14 वर्षांनी सेवा सोडण्यास भाग पाडण्याऐवजी, महिला अधिकाऱ्यांना 2020-21 पासून लष्करात कायमस्वरूपी कमीशन (पीसी) मिळू लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App