आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल ५८ वर्षांनंतर जिंकले सुवर्णपदक

 सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने रचला इतिहास

विशेष प्रतिनिधी

दुबई  : दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार दुहेरी जोडीने रविवारी ५८ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला आणि दिनेश खन्ना नंतर सुवर्ण जिंकले.  India Won Gold In Asian Badminton Championship

२०२२ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्यांनी उत्कंठापूर्ण ठरलेल्या अंतिम सामन्यामध्ये ओंग येव सिन आणि तेओ यी यी या मलेशियाच्या जोडीला २१-१६, १७-२१, १९-२१ असे पराभूत करून जबरदस्त पुनरागमन केले. खंडीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खन्ना हा एकमेव भारतीय आहे, त्याने १९६५ मध्ये लखनऊ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत भारताची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी १९७१ मध्ये दीपू घोष आणि रमण घोष यांनी कांस्यपदक जिंकून केली होती. आता सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळवलेल्या यशाचे पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले आहे.

 India Won Gold In Asian Badminton Championship

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात