दुनियेत शांतता प्रस्थापनेसाठी भारत मजबूत हवा; आरिफ मोहम्मद खान यांची महात्मा गांधींना श्रद्धांजली


वृत्तसंस्था

साबरमती : दुनियेमध्ये जर तुम्ही शांतता प्रस्थापित करू पाहत असाल तर प्रथम भारत मजबूत हवा. त्यासाठीच राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी साबरमती आश्रमात केले आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते येथे आले होते. India needs to be strong for establishing peace in the world

आरिफ मोहम्मद खान म्हणाले :

जगात शांतता हवी असेल तर भारतालाच मजबूत व्हावे लागेल. भारताची एकात्मता आणि अखंडचा टिकवण्यासाठी राष्ट्रवादाची भावना उपयुक्त ठरेल.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर झालेल्या फाळणीचे घाव आम्ही विसरलो. आम्ही देश बांधणीच्या कामालाही लागलो. आम्हाला विसरण्याची वाईट सवय आहे. पण शेजारचा देश आम्हाला काहीच विसरू देत नाही. उलट “अनफिनिश्ड अजेंडा ऑफ पार्टिशन” असे म्हणून शेजारचा देश जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवतो. आम्हाला त्या दहशतवादाशी लढावेच लागेल. इतरांना इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर स्वसंरक्षणासाठी भारताला मजबूत व्हावेच लागेल.

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत भारतच चांगले काम करू शकेल. स्वातंत्र्यानंतरचा गेल्या 75 वर्षांचा अनुभव घेऊन पुढची वाटचाल करावी लागेल.

India needs to be strong for establishing peace in the world

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात