वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशात आता भारतानं ब्राझीललाही मागे टाकलं आहे. भारत जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. India is second in the world in the number of corona patients, behind Brazil; U.S. number one
सोमवारी देशात कोरोनाचे सर्वाधिक 1,68,912 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1,35,27,717 वर पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 लाखाहून अधिक आहे.
कोरोनामुळे सोमवारी 904 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 1,70,179 वर पोचला आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानं ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये 1,34,82,023 रुग्ण आढळले. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आढळले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोचला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App