समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाने 86 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती दिली आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेला हा छापा पूर्ण झाला आहे. यानंतर अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, लखनऊ, मैनपूर, कोलकाता, बंगळुरू आणि एनसीआरमधील 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल डेटादेखील जप्त करण्यात आला आहे. Income tax raids Samajwadi Party leader admits undeclared income of Rs 68 crore, reveals in IT raids
वृत्तसंस्था
लखनऊ : समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाने 86 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती दिली आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेला हा छापा पूर्ण झाला आहे. यानंतर अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, लखनऊ, मैनपूर, कोलकाता, बंगळुरू आणि एनसीआरमधील 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल डेटादेखील जप्त करण्यात आला आहे.
18 डिसेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली होती. प्राप्तिकर विभागाने मऊ येथील राजीव राय, मैनपूरमधील मनोज यादव आणि लखनऊमधील जैनेंद्र यादव यांच्या घरांवरही शोधमोहीम राबवली होती. याशिवाय कोलकाता येथील एका एंट्री ऑपरेटरच्या घरावरही छापा टाकण्यात आला.
बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यांच्याकडून कोरी बिल बुक, शिक्के, स्वाक्षरी केलेले धनादेश यांसह अनेक कागदपत्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
निवेदनानुसार, बांधकाम कंपनीच्या संचालकांकडून 86 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती प्राप्त झाली आहे, त्यापैकी 68 कोटी रुपयांची रक्कम मालकाने मान्य केली आहे आणि त्यावर कर भरण्यास सांगितले आहे. काही वर्षांतच या कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांची झाली, मात्र हे कसे घडले, याचा कोणताही पुरावा मालकाच्या बाजूने मांडता आला नाही.
शोध मोहिमेदरम्यान शेल कंपन्यांच्या माध्यमातून 12 कोटी रुपयांच्या अघोषित गुंतवणुकीची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे. याशिवाय दुसऱ्या प्रकरणात 11 कोटी रुपयांची गुंतवणूकही आढळून आली असून बेनामी मालमत्तेत साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
दुसरीकडे, कोलकाता येथील एका एंट्री ऑपरेटरवर टाकलेल्या छाप्यात या लोकांना मदत करण्यासाठी त्याने अनेक शेल कंपन्या स्थापन केल्याचे आढळून आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांमध्ये 408 कोटी रुपयांच्या बनावट शेअर्सची एन्ट्री झाली होती आणि या कंपन्यांच्या माध्यमातून 154 कोटी रुपयांचे बनावट कर्जही देण्यात आले होते. या संपूर्ण खेळात एंट्री ऑपरेटरचा सहभाग असल्याची कबुली दिली असून, कमिशनमधून पाच कोटी रुपये कमावल्याचेही कबूल केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App