कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांच्या भावाच्या घरातून आयकर विभागाने एक कोटी रुपये जप्त केले आहेत. अशोक कुमार पुत्तूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांचे भाऊ सुब्रमण्यम राय यांच्या घरावर छापा टाकला. येथे त्यांना झाडावर एका पेटीत ठेवलेले एक कोटी रुपये ठेवलेले आढळले.Income Tax Department raids Congress candidate’s brother’s house in Karnataka, Rs 1 crore found in tree



अधिकाऱ्यांनी घरातील महिलांची केली चौकशी

एजन्सीच्या वृत्तानुसार, आयकर अधिकारी सुब्रमण्यम राय यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या बागेत लावलेले झाड पाहिले. यामध्ये दाट फांद्यांच्या मध्ये एक पेटी ठेवलेली दिसत होती. अधिकाऱ्यांनी घरातील महिलांना विचारले की हे काय आहे? यात कॅश आहे का? हे इथे कोणी ठेवले?

अधिकारी म्हणतात मॅडम आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत, उत्तर द्या. यावर एका महिलेने उत्तर दिले की, ते मी ठेवले आहेत. अधिकारी विचारतात की, ते इथे ठेवायला कोणी दिले आणि काय सूचना दिल्या? यावर महिला उत्तर देण्यापूर्वीच व्हिडिओ संपतो.

कर्नाटकात काही दिवसांपासून आयटीचे छापे

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. याअंतर्गत, योग्य कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात रोख एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यास परवानगी नाही.

त्यामुळे अवैध पैसा जप्त करण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू असून पोलीसही याप्रकरणी सक्रिय झाले आहेत. 13 एप्रिल रोजी बेंगळुरू पोलिसांनी दोन व्यक्तींकडून 1 कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त केली. सिटी मार्केट परिसरातून एका ऑटोतून ही कारवाई करण्यात आली.

Income Tax Department raids Congress candidate’s brother’s house in Karnataka, Rs 1 crore found in tree

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात