उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाहीए. नोटांचा जो पहाड संपूर्ण देशाने पाहिला हे त्यांचेच काम आहे. हेच त्यांचे सत्य आहे. यूपीची जनता सर्वकाही बघतेय आणि समजतेय, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यावर केला आहे.In Uttar Pradesh, the scent of corruption sprayed before 2017 is now coming to the fore, PM attacks Samajwadi Party
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाहीए. नोटांचा जो पहाड संपूर्ण देशाने पाहिला हे त्यांचेच काम आहे. हेच त्यांचे सत्य आहे. यूपीची जनता सर्वकाही बघतेय आणि समजतेय, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यावर केला आहे.
अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर केंद्रीय संस्थांनी टाकलेल्या छप्यातून कोट्यवधींची रोकड आणि अनेक किलो सोने जप्त करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी आज कानपूर येथे झालेल्या सभेत नाव न घेता समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी भरभरून नोटा आढळून आल्या. यानंतरही हे सर्व आम्हीच केलं आहे, असं हे लोक म्हणतील.
पण कानपूरचे नागरिक बिजनेस, व्यापार-व्यवसाय चांगल्याप्रकारे समजू शकतात. ज्या राजकीय पक्षांचे आर्थिक धोरणच भ्रष्टाचार आहे, ते यूपीचा विकास करू शकत नाही . ज्या राजकीय पक्षांचे आर्थिक धोरणच भ्रष्टाचार आहे, ज्यांचे धोरणच बाहुबलींचा आदर सत्कार करण्याचे आहे, ते उत्तर प्रदेशचा विकास करू शकत नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयावर टीका करताना म्हणाले, काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने छापा मारला, तर अखिलेख भाऊच्या पोटात दु:खू लागलं. राजकीय सूडातून छापेमारी केल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. पण आज त्यांना उत्तर काय द्यायचं, हे सूचत नाही. कारण समाजवादी अत्तर बनवणाºयाच्या घरावरील छाप्यातून अडीचशे कोटी रुपये मिळालेत. कोणी अडीचशे कोटी बघितले आहेत का? पण यूपीच्या जनतेला लूटलेले अडीचशे कोटी रुपये एका अत्तरवाल्याच्या घरातून निघाले आहेत. अखिलेशजी तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येण्यापूर्वीच स्पष्ट केले होते, देशातील भ्रष्टाचाराला आळा घालणार आणि काळा पैसा संपवणार’, असं अमित शहा म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App