विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय मिळविणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 1985 पासून सलग दोन वेळा काम करणारे राज्यातील पहिले मुख्यमंत्री बनणार आहेत.In Uttar Pradesh, only Yogi Adityanath, BJP is expected to win 230 to 249 seats
टाईम्स नाऊ आणि नवभारतसाठी व्हेटो या संस्थेने १० ते ३० डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ४०३ सदस्यांच्या सभागृहात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला २३०-२४९ जागांचा अंदाज आहे. समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील युती १३७ ते १५२ जागांसह पिछाडीवर पडण्याचा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष आणि कॉँग्रेस स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. बसपला ९ ते १४ जागा तर कॉँग्रस पूर्णपणे उखडून जाणार असून एक अंकी जागांवर येणार आहे.
भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार असले तरी २०१७ च्या तुलनेत मतांची टक्केवारी मात्र घटणार आहे. २०१७ मध्ये भाजपाला सुमारे ४१ टक्के मते मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांची टक्केवारी ३८.६ टक्यांपर्यंत घटणार आहे. समाजवादी पक्षाला मात्र गेल्या वेळीपेक्षा जास्त म्हणजे ३४.४ टक्के मते मिळण्याचा अंदाजच आहे.
विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी बहुजन समाज पक्षाची मते मोठ्या प्रमाणावर फोडली असल्याचेही दिसून आले आहे. २०१७ मध्ये बसपला जागा कमी मिळल्या तरी त्यांची मतांची टक्केवारी २२.२ टक्के होती. मात्र, यावेळी त्यांना १४ टक्केच मते मिळतील असा अंदाज आहे.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सुधारलेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती भाजपाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावणार असल्याचे दिसून आले आहे. काशी आणि मथुरेचा मुद्दाही भाजपसाठी महत्वाचा ठरणार आहे.लखीमपूर खेरीची घटना आणि कोविडची दुसरी लाट यामुळे भाजपच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये काहीशी घट झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App