बंगालपाठोपाठ मोदींचे तामिळनाडूवर political concentration; मोदींच्या वक्तव्याचे between the lines!!; कलैग्नारांबरोबर काम केलेले नेते अस्वस्थ आहेत!!


विनायक ढेरे

नाशिक : देशातल्या सगळ्या मीडियाचे लक्ष ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालवर लागून राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र बंगालबरोबर तामिळनाडूववरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत.In Tamil Nadu, the situation is such that senior DMK leaders who worked soldier to soldier with Kalaignar are feeling suffocated due to the newly minted crown prince of the party

साधारण गेल्या आठवडाभरातील त्यांच्या तामिळनाडू दौऱ्याचा मागोवा घेतला आणि त्यातले between the lines बारकाईने वाचले तर ही गोष्ट लक्षात येईल. मोदींना तामिळनाडूच्या डीएमके पक्षातील अस्वस्थता लक्षात आली आहे आणि ते त्यावर political concentration करताना दिसत आहेत.मोदी काल रात्री मदुराईत आले. त्यांनी मीनाक्षी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मदुराईच्या सभेत भाषण केले. त्यानंतर कन्याकुमारीच्या सभेत भाषण केले. या दोन्ही भाषणांमध्ये महिलांचा सन्मान आणि डीएमकेमधल्या परिवार राजकारणावर भर दिला.

इतकेच नाही, तर त्यांनी पहिल्यांदा किंबहुना नेमक्या वेळी डीएमके पक्षातील दुसऱ्या आणि मध्यल्या फळीतील नेत्यांच्या अस्वस्थतेवर अचूक बोट ठेवले आहे.

त्यांनी डीएमकेमधल्या मुला – नातवंडाच्या राजकारणावर भाष्य केले आहे. एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्या वाढत्या प्रभावामुळे डीएमकेमधले बरेच नेते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीला मोदींनी राजकीय वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कन्याकुमारीच्या सभेत मोदी म्हणाले, की काँग्रेस आणि डीएमके यांना स्वतःचा परिवार चालविण्यासाठी पार्टी चालवायची आहे. त्यांना स्वतःच्या मुला – नातवंडांची, पुढच्या पिढ्यांची सोय करायची आहे. जनतेच्या मुला – नातवंडांच्या भवितव्याविषयी काँग्रेस आणि ड़ीएमके यांना काही देणे – घेणे नाही.

आज डीएमकेमध्ये कलैग्नारांबरोबर म्हणजे करूणानिधींबरोबर काम केलेल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी कुचंबणा होते आहे. त्यांना आपल्याला बाजूला टाकल्याचे आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची जाणीव पोखरत आहे.

एक परिवार सोडून डीएमकेमधले सगळे नेते अस्वस्थ आहेत, असे विधान करून मोदींनी डीएमकेवर राजकीय बाँम्ब टाकला आहे. त्याचे परिणाम शेवटच्या दोन दिवसांत आणि निवडणूकीनंतरही दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय मीडियाच्या नजरेतून ही महत्त्वाची राजकीय घडामोड सुटली आहे. तामिळनाडूची निवडणूक इक्वल फूटिंगवर आलेली असताना मोदींनी अशी भाषणे करणे आणि दुसरीकडे डीएमकेच्या नेत्यांनी मोदींवर पर्सनल ऍटॅक करणे

या दोन्हीच्या राजकीय मिश्रणातून… सुरूवातीला डीएमकेच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या दोन – तीन दिवसांमध्ये काट्याची टक्कर बनून अखेरीस अण्णा द्रमूक – भाजपच्या पारड्यात विजय टाकू शकते, याचा कदाचित मोदींना अंदाज आला आहे. यातून ते तामिळनाडूत राजकीय पावले टाकताना आणि राजकीय विधाने करताना दिसत आहेत.

In Tamil Nadu, the situation is such that senior DMK leaders who worked soldier to soldier with Kalaignar are feeling suffocated due to the newly minted crown prince of the party

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था