झारखंडमध्ये काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराकडून शिवमंदिरात पूजा, भाजप खासदाराकडून आक्षेप ; नवा वाद पेटला


वृत्तसंस्था

रांची : झारखंड राज्यातील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी बुधवारी देवघर येथील प्रसिद्ध बैद्यनाथ धाम मंदिरात पूजाअर्चा केली. भगवान शिवाचे अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या या मंदिरात हिंदू वगळता अन्य धर्मियांना प्रवेश नसताना अन्सारी यांनी पूजा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.In Jharkhand, Congress Muslim MLA worships at Shiva temple, BJP MP objects; A new argument broke out

दुसरीकडे भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी अन्सारी यांच्या अटकेची मागणी केली आहे.अन्सारी यांनी दावा केला की, मी लहानपणापासून शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी येतो. प्रत्येक निवडणुकीत भोले बाबा यांच्यामुळेच मी विजयी झालो आहे.भोले बाबा यांच्यापासून मला दूर लोटणारे निशिकांत दुबे कोण आहेत ? त्यावर दुबे म्हणाले, आजपर्यंत हिंदू सोडून येथे कोणालाही प्रवेश नाही. जसा काबा येथे मुस्लिम सोडून अन्य धर्मियांना प्रवेश नाही दिला जात. दरम्यान दुबे आणि अन्सारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर युद्ध सुरू आहे.

गोद्दा रेल्वेस्थानकाच्या उदघाटन कार्यक्रमावरून दोघात मतभेद झाले. त्यानंतर दोघात वारंवार कोणत्याही कारणावरून खटके उडत आहेत. रेल्वेस्टेशनचे उदघाटन कोरोनामुळे व्हरच्युल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सोरेन सरकारने घेतला.

 

त्याला खासदार दुबे यांनी आक्षेप घेऊन ते थाटात करावे, असा आग्रह धरला. त्याला अन्सारी यांनी उत्तर देताना सांगितले रेल्वेस्टेशनचे उदघाटन केवळ मुख्यमंत्री सोरेन यांच्या हस्तेच होईल. रेल्वेस्टेशन उदघाटनाचा वाद आता थेट मंदिर प्रवेशापर्यंत पोचला आहे.

In Jharkhand, Congress Muslim MLA worships at Shiva temple, BJP MP objects; A new argument broke out

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी