वृत्तसंस्था
रांची : झारखंड राज्यातील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी बुधवारी देवघर येथील प्रसिद्ध बैद्यनाथ धाम मंदिरात पूजाअर्चा केली. भगवान शिवाचे अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या या मंदिरात हिंदू वगळता अन्य धर्मियांना प्रवेश नसताना अन्सारी यांनी पूजा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.In Jharkhand, Congress Muslim MLA worships at Shiva temple, BJP MP objects; A new argument broke out
दुसरीकडे भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी अन्सारी यांच्या अटकेची मागणी केली आहे.अन्सारी यांनी दावा केला की, मी लहानपणापासून शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी येतो. प्रत्येक निवडणुकीत भोले बाबा यांच्यामुळेच मी विजयी झालो आहे.
भोले बाबा यांच्यापासून मला दूर लोटणारे निशिकांत दुबे कोण आहेत ? त्यावर दुबे म्हणाले, आजपर्यंत हिंदू सोडून येथे कोणालाही प्रवेश नाही. जसा काबा येथे मुस्लिम सोडून अन्य धर्मियांना प्रवेश नाही दिला जात. दरम्यान दुबे आणि अन्सारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर युद्ध सुरू आहे.
बाबा भोलेनाथ के दरबार में हजारों बार गया हूं ।लेकिन भगोड़े सांसद की नजर में पहली बार गया हूं ।इतिहास पता नहीं ,मां पार्वती और शंकर भगवान जी के मंदिर का गठजोड़ हमारे पूर्वजों के द्वारा बुने धागे से होता आ रहा है@INCJharkhand @RahulGandhi @BJP4Jharkhand @nishikant_dubey pic.twitter.com/8tVcChDLmV — Dr. Irfan Ansari (@IrfanAnsariMLA) April 14, 2021
बाबा भोलेनाथ के दरबार में हजारों बार गया हूं ।लेकिन भगोड़े सांसद की नजर में पहली बार गया हूं ।इतिहास पता नहीं ,मां पार्वती और शंकर भगवान जी के मंदिर का गठजोड़ हमारे पूर्वजों के द्वारा बुने धागे से होता आ रहा है@INCJharkhand @RahulGandhi @BJP4Jharkhand @nishikant_dubey pic.twitter.com/8tVcChDLmV
— Dr. Irfan Ansari (@IrfanAnsariMLA) April 14, 2021
गोद्दा रेल्वेस्थानकाच्या उदघाटन कार्यक्रमावरून दोघात मतभेद झाले. त्यानंतर दोघात वारंवार कोणत्याही कारणावरून खटके उडत आहेत. रेल्वेस्टेशनचे उदघाटन कोरोनामुळे व्हरच्युल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सोरेन सरकारने घेतला.
त्याला खासदार दुबे यांनी आक्षेप घेऊन ते थाटात करावे, असा आग्रह धरला. त्याला अन्सारी यांनी उत्तर देताना सांगितले रेल्वेस्टेशनचे उदघाटन केवळ मुख्यमंत्री सोरेन यांच्या हस्तेच होईल. रेल्वेस्टेशन उदघाटनाचा वाद आता थेट मंदिर प्रवेशापर्यंत पोचला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App