विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला भगदाड पडले आहे. एकापाठोपाठ एका हिमाचलमधील नेते आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. हिमाचलमधील आपच्या महिला मोर्चा अध्यक्ष ममता ठाकूर यांच्यासह काही नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.In Himachal Pradesh Aam Aadmi Party Mahila Morcha state president joins BJP
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये आपने पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यांनतरही आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन महामंत्री सतीश ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आपने त्यांना महिलांविषयीच्या वागण्यावरुन आणि बोलण्यावरुन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं होतं.
आता प्रदेशाध्यक्ष ममता ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केल्याने खिंडार पडणे सुरूच आहे. यानंतर आपचे नेते आणि दिल्लीतील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्वीटर वरुन याची माहिती देवून लवकरच नवीन कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App