5G services : देशात कशी असेल सेवा?; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय?… वाचा तपशीलवार


वृत्तसंस्था

अहमदाबाद : देशात 5G सेवेचे उद्घाटन झाल्याबरोबर जनतेची उत्सुकता वाढली आहे. 5G services म्हणजे सेवा नेमक्या कशा असतील?, याची उत्सुकता सर्वांना आहे.  In coming 6 months, 5G services to be available in over 200 cities

या संदर्भात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी खुलासा केला आहे. देशभरात येत्या 6 महिन्यांमध्ये 5G services 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध होईल. ही सेवा देशात 80 ते 90% भागापर्यंत पोहोचवण्याचे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल.

BSNL कंपनी 5G services 15 ऑगस्ट 2023 नंतर सुरू करेल. या सेवा सर्वसामान्य जनतेला परवडणारे असतील.

अन्य खासगी कंपन्या देखील या स्पर्धेत उतरल्या असून रिलायन्स जिओ डिसेंबर 2022 पर्यंत सर्व देशाभरात 5G Services उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक भारतीयाला या सेवा परवडणाऱ्या राहतील. डिव्हाइस पासून सेवेपर्यंत जास्तीत जास्त स्वस्तात पर्याय उपलब्ध करून देण्याचा रिलायन्स जिओचा प्रयत्न राहील, असे आश्वासन रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी दिले आहे.

Vodafone-Idea कंपनीने देखील या सेवा पुरवण्यासाठी भरपूर तयारी केली असून विविध क्षेत्रांमध्ये सेवा पुरवण्यासाठी कंपनी तत्पर असेल, अशी ग्वाही आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली आहे.

 

In coming 6 months, 5G services to be available in over 200 cities

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय