दोन पेक्षा अधिक अपत्यं असल्यास आसाममध्ये सरकारी योजनांचा लाभ बंद; मुख्यमंत्र्यांची घोषणा


वृत्तसंस्था

दिसपूर : आसाममध्ये दोन पेक्षा जास्त अपत्यं असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केली. In Assam if there are more than two children Benefit of government schemes closed; CM’s announcement

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, “राज्यातील काही अशा योजना आहेत की ज्याच्या लाभासाठी आम्ही दोन अपत्यांची अट घालू शकतो. पंतप्रधान आवास योजना, शाळा, महाविद्यालय तसेच इतर ठिकाणचे प्रवेश असतील अशा प्रकारच्या राज्याच्या हातातील योजनांमध्ये दोन अपत्यांची अट असेल. त्यानंतर हळूहळू राज्यातील सर्व योजनांसाठी ही अट लागू करण्यात येईल.”

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीन जिल्ह्यांतील अल्पसंख्यांकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंबंधी काही सूचना दिल्या होत्या. या जिल्ह्यांतील लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘सभ्य परिवार नियोजन निती’ लागू करण्याचा आग्रह धरला होता. या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांतील आणि बांग्लादेशातील मुस्लिम मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत असल्याने समस्या निर्माण होत आहेत अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती.

आसाममध्ये पंचायतीच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान शैक्षणिक योग्यता आणि शौचालयाची आवश्यकता तसेच कमाल दोनच अपत्यांची अट घातली आहे.

In Assam if there are more than two children Benefit of government schemes closed; CM’s announcement

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती