विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमधील वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी अनेक मोहिमा चालविल्या जात आहेत. तरीही प्रत्यक्षात मोदी सरकारच्या काळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही माहिती लोकसभेत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली. काँग्रेसचे सदस्य सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर (चंद्रपूर) यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. Imports from China have increased over the past seven years Information of Piyush Goyal in Lok Sabha
२०१४ ते २०२१ या काळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंचे प्रमाण किती आहे, अशी विचारणा धानोरकर यांनी केली होती. केंद्र सरकारने २०१४ मध्ये चीनमधून ६०.४१ दशलक्ष डॉलर किंमतीच्या वस्तूंची आयात झाली होती. यानंतर प्रत्येक वर्षी यात वाढ होत गेली आहे.
२०१५-१६ मध्ये ६१.७१, २०१७-१८ मध्ये ७६.३८ दशलक्ष अमेरिकनडॉलर किंमतीच्या वस्तूंची आयात झाली होती. २०२०-२१ या वर्षात ही आयात ६५.२१ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी झाली होती, अशी माहिती गोयल यांनी दिली.डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळापेक्षा ही वाढ १९२ टक्के अधिक आहे.
गोयल यांनी यावेळी सांगितले की, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये दूरसंचार उपकरणे, संगणक हार्डवेअर, खते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, औषधी, वीज उपकरणांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीतही वाढ झाल्याचे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.
२०१४-१५ मध्ये देशातून चीनमध्ये ११.९१ दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीच्यावस्तुंची निर्यात झाली. हे प्रमाण २०२०-२१ मध्ये २१.१९ दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीच्या वस्तूंएवढे होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App