विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना केंद्र आणि विविध राज्यांनी सुरक्षा उपाययोजना शिथिल करता कामा नये.’’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवर यंत्रणेकडून जी मोकळीक दिली जात आहे, त्याबद्दल देखील संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. IMA warns for third wave
जगातील आतापर्यंतच्या विविध साथींचा अभ्यास केला तर तिसरी लाट कधीही येऊ शकते. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी लोकांची गर्दी आणि त्यांच्याकडून होणारे नियमांचे उल्लंघन याबाबी खरोखरच चिंताजनक असल्याचे मत आयएमएकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
‘‘ पर्यटन, यात्रा, सण आणि उत्सव या सगळ्या गोष्टी आवश्यलक असल्या तरीसुद्धा त्यासाठी आपण काहीकाळ नक्कीच वाट पाहू शकतो. लस न घेताच लोक अशा कार्यक्रमांत सहभागी होत असतील तर ते या संसर्गाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात.’’ अशी भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App