गोव्यात नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, यंदापासून सत्यजित रे जीवनगौरव


वृत्तसंस्था

पणजी – गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०२१ या काळात ५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत याचे पोस्टर जारी केले आहे. IFFI will start in November

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५२ व्या आवृत्तीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वेळी इफ्फीमध्ये भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करेल. तसेच, त्यांच्या कारकिर्दीचा वारसा जपत, चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ‘सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार’ यंदापासून प्रत्येक वर्षी देण्यात येणार आहे.

गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करीत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशन (एफआयएपीएफ) द्वारे इफ्फीला मान्यता आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि भारत आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात.

IFFI will start in November

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात