दोन बहिणी एका संस्थेत शिकत असतील तर एकीची फी माफ करावी ;उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आवाहन


वृत्तसंस्था

लखनौ : दोन बहिणी एकाच खासगी संस्थेत शिकत असतील तर त्या पैकी एकीची फी माफ करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.If two sisters are studying in the same institute, the fee of one should be waived: Appeal of Chief Minister of Uttar Pradesh Yogi Aditynaath

लखनौ येथील पोलिस मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या पोलिसांना पदक प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.योगी म्हणाले, खासगी शाळा किंवा महाविद्यालयात एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी किंवा त्या पेक्षा अधिक बहिणी शिकत असतील तर एकीची फी माफ करायला काय हरकत आहे ? त्यासाठी सरकार प्रयत्न आता करणार आहे.संस्था त्यासाठी तयार नसतील तर शिक्षण विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. कोरोना काळात अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

If two sisters are studying in the same institute, the fee of one should be waived: Appeal of Chief Minister of Uttar Pradesh Yogi Aditynaath

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”