ममता बॅनर्जींनी मुस्लिमाला मुख्यमंत्री बनवले तर मी मुंडन करेन’, पीएम मोदींच्या मुस्लिम चाहत्याचे दीदींना आव्हान

PM Modis Muslim fan : निवडणुका आणि हिंदू-मुस्लिम मुद्दा यांचा खूप जुना संबंध आहे. प्रत्येक निवडणुकीत ओघानेच हा मुद्दा चर्चेत येतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जींनी हिंदू-मुस्लिम मुद्दा चांगलाच चर्चेत आणला. कधी हिंदूंना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आपले गोत्र सांगितले, तर कधी मुस्लिमांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दिकी आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींवर हल्ला चढवला. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने पीएम मोदींच्या एका जबरा फॅनची मुलाखत घेतली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुस्लिम चाहत्याने ममता बॅनर्जी यांना एक प्रश्न विचारला आहे. यासह ममता बॅनर्जी यांनाही एक आव्हानही दिले आहे. If Mamata Banerjee makes a Muslim chief minister, I will shave My Head’, PM Modis Muslim fan challenges Didi


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : निवडणुका आणि हिंदू-मुस्लिम मुद्दा यांचा खूप जुना संबंध आहे. प्रत्येक निवडणुकीत ओघानेच हा मुद्दा चर्चेत येतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जींनी हिंदू-मुस्लिम मुद्दा चांगलाच चर्चेत आणला. कधी हिंदूंना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आपले गोत्र सांगितले, तर कधी मुस्लिमांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दिकी आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींवर हल्ला चढवला. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने पीएम मोदींच्या एका जबरा फॅनची मुलाखत घेतली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुस्लिम चाहत्याने ममता बॅनर्जी यांना एक प्रश्न विचारला आहे. यासह ममता बॅनर्जी यांनाही एक आव्हानही दिले आहे.

‘मुस्लिम हे करू शकतात का?’

पीएम नरेंद्र मोदींचे चाहते आणि भाजप कार्यकर्ते झुल्फिकार अली म्हणाले की, जर सर्व मुस्लिम एकत्र प्रेमाने राहिले, कुणाचाही छळ करत नाहीत तर त्यांनी फक्त एका गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे. सर्व मुस्लिम सर्वकाळ टोपी घालून राहू शकतात का? एकाही हिंदू दुकानातून सामान घ्यायचे नाही, असा निश्चय ते करू शकतात का? हिंदू बसचालक असला तर बसमध्ये जायचे नाही, जर एखादा हिंदू रेल्वेचालक असेल तर तो रेल्वेत जायचे नाही, एखादा हिंदू पायलट असेल तर विमानात जाणार नाही, जर एखाद्या पोलीस ठाण्यात हिंदू असेल, तर तेथे एफआयआर नोंदवायचा नाही… असं हे करू शकतात का? हे लोक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करतात.

‘ममता बॅनर्जी आम्हाला मूर्ख समजतात’

झुल्फी म्हणतात, ‘ममता बॅनर्जी एखाद्या मुस्लिमाला मुख्यमंत्रिपदाची संधी देतील का? त्या मुस्लिमाला मुख्यमंत्री बनवतील का? त्या आम्हाला मूर्ख समजतात. आम्हाला फक्त लॉलीपॉप देण्यात आले आहे. जर त्यांनी एखाद्या मुस्लिमाला मुख्यमंत्री बनवले तर मी मुंडन करेन. ममता बॅनर्जी आम्हाला मूर्ख बनविण्यासाठी इफ्तारमध्ये जातात. आता भाजपबाबत बोलायचे तर भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री मुस्लिम आहेत. ममतांनी मुस्लिमांसाठी जे केले ते आपल्या सर्वांसमोर आहे. हिंदूंच्या मनात मुळातच मुस्लिमांबद्दल प्रेम आहे.’

If Mamata Banerjee makes a Muslim chief minister, I will shave My Head’, PM Modis Muslim fan challenges Didi

If Mamata Banerjee makes a Muslim chief minister, I will shave My Head', PM Modis Muslim fan challenges Didi

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*