दिल्लीत दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण; अमित शहांना संसदेत घेरण्याची विरोधकांची तयारी


अमित शाह संसदेत आले, तर मी मुंडण करेन; तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायनचे आव्हान


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अमित शाह यांना विचित्र जाहीर आव्हान दिले आहे. अमित शहा संसदेत आले तर मी मुंडन करेन असे डेरेक ओब्रायन म्हणाले. I Will Shave My Head If Amit Shah Comes To Parliament Derek Obrien Challenge Amit Shah

पेगॅसस, कृषी कायदे आणि आसाम-मिझोराम संघर्षासह विविध मुद्द्यावरून संसदेत गदारोळ बघायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच पेगॅसस हेरगिरी प्रकरण समोर आल्याने त्यावर चर्चा आणि चौकशी करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद संसदेत उमटण्याची चिन्हे आहेत.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर आव्हान दिले आहे. जर अमित शाह यांनी संसदेत येऊन दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणी निवेदन दिले, तर मी मुंडण करून येईन”, असे ओब्रायन म्हणाले.

डेरेक ओब्रायन यांनी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे आव्हान दिले आहे. ओब्रायन म्हणाले,”विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. आम्हाला तीन मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. कृषी कायदे, अर्थव्यवस्था, रोजगार, महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा (पेगॅसस). सर्वात आधी पेगॅससच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे”, असे ओब्रायन म्हणाले.



“मी आता हरवलेल्या व्यक्तींबद्दलची नोटीस काढणार आहे. मी नक्कीच हे करेन. जर आम्ही एक जबाबदार विरोधक असू, तर आम्ही बेपत्ता झालेल्या व्यक्तींबद्दल तक्रार दाखल करायला हवी. मी केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत बघितलं नाही. पंतप्रधानांना संसदेत बघितलं नाही. त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्याला दिल्लीत नियुक्त करण्यात आलं. एका नऊ वर्षाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मग केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन उत्तर द्यायला नको का?”, असा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलताना ओब्रायन म्हणाले, की जर अमित शाह आज (४ ऑगस्ट) राज्यसभा वा लोकसभेत आले आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेवर निवदेन केलं, तर मी मुंडण करून तुमच्या कार्यक्रमात येईन. मी अमित शाह यांना आव्हान देतोय, कारण ते पेगॅसस प्रकरणाच्या चर्चेपासून पळ काढत आहेत”, असं ओब्रायन म्हणाले.

गेल्या सात वर्षात भाजपा सरकारने फक्त ११ % विधेयकांची पडताळणी आणि चर्चा केली आहे. भाजपाचे मंत्री आणि प्रवक्ते ही मुलाखत बघत असतील, तर त्यांनी यावर बोलावे. युपीएच्या काळात हेच प्रमाण ६० ते ७०% होतं. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री दिल्लीत आले, तेव्हा त्यांनी हे प्रमाण २५ टक्क्यांवर आणलै आणि आता ११ टक्के आहे. २०१६ पासून मोदींनी संसदेत किती प्रश्नांना उत्तरं दिली आहेत? त्यांना संसदेत त्यांचे नियम बनवायचे आहेत. विरोधकांना चर्चा हवीये, असेही ओब्रायन म्हणाले.

I Will Shave My Head If Amit Shah Comes To Parliament Derek Obrien Challenge Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात