विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्रिसमस निमित्त देशभरातील ख्रिश्चन बांधवांना तसेच देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. जीझस ख्राइस्टच्या जीवनातून आपण शांती संदेश घेतला पाहिजे, असे ट्विट मोदींनी केले आहे. सर्वसाधारणपणे पंतप्रधान विविध सणांना ज्या पद्धतीच्या शुभेच्छा देतात त्याच पद्धतीच्या या शुभेच्छा आहेत. Hypocrisy is the homage that vice pays to virtue
परंतु ज्येष्ठ चरित्रकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांना पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील टोचल्या आहेत. मोदींनी केलेल्या शुभेच्छा ट्विटवर रामचंद्र गुहा यांनी कमेंट करत मोदींचे ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारी ट्विट रिट्विट केले आहे. यात रामचंद्र गुहा म्हणतात, ही तर दुर्गुणांनी सद्गुणांना वाहिलेली श्रद्धांजली आहे!! म्हणजे मोदींनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देणे हे दुर्गुणांनी सद्गुणांना श्रद्धांजली वाहण्यासारखे आहे, अशा आशयाची इंग्रजी म्हण रामचंद्र गुहा यांनी आपल्या ट्विट मध्ये वापरली आहे.
Hypocrisy is the homage that vice pays to virtue. https://t.co/azvYoqdjvL — Ramachandra Guha (@Ram_Guha) December 25, 2021
Hypocrisy is the homage that vice pays to virtue. https://t.co/azvYoqdjvL
— Ramachandra Guha (@Ram_Guha) December 25, 2021
एरवी रामचंद्र गुहा हे मोदींचे राजकीय टीकाकार आहेतच, परंतु ख्रिसमसच्या शुभेच्छा मोदींनी देणे हे देखील रामचंद्र गुहांच्या कथित धर्मनिरपेक्ष भूमिकेला मान्य नाही. हेच यातून दिसून येते. हेच ते रामचंद्र गुहा आहेत, की ज्यांनी अविष्कार स्वातंत्र्याचा घोष लावत अवॉर्ड वापसीला पाठिंबा दिला होता. रामचंद्र गुहा हे मोदींच्या राजकीय भूमिकांवर नियमितपणे टीकास्त्र सोडत असतात. परंतु, आज त्यांनी मोदींनी दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छांवर देखील आपले “विशेष बौद्धिक ट्विट” करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App