कोरोना प्रतिबंधक लसीकरण; नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र; ममतांचाही सुरात सूर

वृत्तसंस्था

कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात कोरोना प्रतिबंधक लस पुरवू शकत नाही. त्यांनी तसे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता करू शकत नाहीत, अशी टीका अभिजित बॅनर्जी यांनी केली आहे.

HWest Bengal CM Mamata Banerjee holds Global Advisory Board meeting over third COVID-19 wave.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अभिजित बॅनर्जी यांच्या सुरात सूर मिसळला असून मोदी सरकारवर कोरोना प्रतिबंधक लस राज्यांना देण्यात भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. गुजरात कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांना केंद्र सरकार पुरेशा लसी देते. परंतु बाकीच्या राज्यांना आवश्यक तेवढ्या लसी पुरवत नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसी वाटपाचा अधिकार केंद्र सरकारने आपल्या हातात घेतला. परंतु, योग्य प्रकारे लसींचे वाटप करणे केंद्र सरकारला जमलेले नाही. त्याच्यात खूप मोठ्या उणिवा आहेत, यावर अभिजित बॅनर्जी यांनी बोट ठेवले आहे.

 

अभिजित बॅनर्जी यांनी काही प्रथमच मोदी सरकारवर टीका केली असे नाही. यापूर्वी देखील त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणा धोरणाबाबत टीका केली आहे. मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला पैसा हातात उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेतली मंदी दूर होत नाही, अशी टीका त्यांनी यापूर्वी केली होती. त्याच्या पुढचे पाऊल टाकत देशभरातील लसीकरणाच्या मुद्द्यावरून देखील अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

देशात करूना प्रतिबंधक लसीचे आवश्यक तेवढे उत्पादन होऊ शकत नाही. केंद्र सरकारची पाहिजे तेवढी क्षमता नाही. अन्यथा लस वाटपातील भेदभावाचा मुद्दा उपस्थित झाला नसता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे

HWest Bengal CM Mamata Banerjee holds Global Advisory Board meeting over third COVID-19 wave.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात