लष्कराचा शंभर टक्के लसीकरणाचा निर्धार, पंतप्रधानांनी प्राधान्य दिल्याबद्दल आभार

केंद्र सरकारने १८ वर्षांखालील सर्व प्रौढांना लसीकरणाची परवानगी दिल्यावर लष्कराने शंभर टक्के लसीकरणाचा निर्धार केला आहे. देशातील सर्व लष्करी जवानांचे आणि अधिकाºयांचे लसीकरण करण्यता येणार आहे. पंतप्रधानांनी लष्कराला प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानले आहेत.Hundred percent immunization decision of the Army, thanks to the Prime Minister for giving priority


नवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ वर्षांखालील सर्व प्रौढांना लसीकरणाची परवानगी दिल्यावर लष्कराने शंभर टक्के लसीकरणाचा निर्धार केला आहे. देशातील सर्व लष्करी जवानांचे आणि अधिकाºयांचे लसीकरण करण्यता येणार आहे.

पंतप्रधानांनी लष्कराला प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानले आहेत.लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, लस हे कोरोनाविरुध्दच्या लढाईतील एकमेव शस्त्र आहे.केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने लष्करी जवानांच्या लसीकरणाला प्राधान्य दिल्याबद्दल कानिटकर यांनी आभार मानले आहेत. सशस्त्र दलांनी शंभर टक्के लसीकरणाचा निर्धार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करासाठी प्राधान्य दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहोत.

लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कोराना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यायला हवे. लसीकरण झाल्यावर आपण आजारी पडत नाही, याचा अर्थ ते पूर्णपणे सुरक्षित आहे, असे कानिटकर यांनी सांगितले.

लष्करामध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याचे कारण म्हणजे लष्करातील बहुतांश जणांचे लसीकरण झाले आहे, असे कानिटकर यांनी सांगितले. हवाई दल आणि नौदलातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग जास्त आहे. यातील ९५ टक्के जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

लष्करातील बहुतांश जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. लष्करामध्ये सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी आहे.

अगदी थोड्या संख्येने असलेल्या कोरोनाबाधितांना सौम्य लक्षणे आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यातील बहुतांश जण आता ठणठणीत बरे असून लवकरच ड्युटीवर तैनात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यापक लसीकरणामुळे लष्कराने कोरोनावर विजय मिळविला,असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी आणि उपचार

Hundred percent immunization decision of the Army, thanks to the Prime Minister for giving priority

महत्वाच्या  बातम्या