विशेष प्रतिनिधी
दिल्ली : स्त्रियांना नाजूक आणि सुंदर म्हणून संबोधले जाते. तर पुरुषांना शक्तीचे प्रतीक मानले जाते. अस्तित्ववादाच्या दृष्टिकोणातून जर विचार केला तर ही गोष्ट ‘पेढा देऊन येडा बनवल्यासारखी’ आहे. स्त्री ही निसर्गतः स्वतंत्र आणि स्ट्राँग असते. शारीरिक दृष्टया आणि भावनिक लेव्हलवरही. मुख्य गोष्ट म्हणजे स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिला पुरुषांना कमी लेखण्याची गरजही नसते. पण आपल्या समाजाची बांधणी अशी झालेली आहे जेथे आजही स्त्रियांच्या मनामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असणे, एका पुरुषाचे स्त्रीच्या आयुष्यात असणे या गोष्टींना ग्लोरिफाय केलं जातं.
How appropriate is it for men to beat women? There was a shocking revelation in the service
स्त्रिया शिकताहेत, प्रगती करताहेत, अवकाशात जातायत. कुठले असे क्षेत्र नाही जिथे स्त्री सध्या काम करताना दिसून येत नाही. स्त्री स्वातंत्र्य झाली, तिला नोकरी करण्याची परवानगी मिळाली, घरातून तिला तिचे अधिकार दिले जातात. अशी वाक्ये आपण बऱ्याच वेळा ऐकली असतील. पण तिला तिचे हे अधिकार कोण देतं?तिला तिचेच अधिकार देणारा व्यक्ती स्वतःला कोणत्या पोझिशनमध्ये ठेवतोय? ही पोझिशन समाजाने आखून दिलेल्या एका चौकटीत बसणारीच आहे. आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या या गोष्टींमुळे बऱ्याच स्त्रियांना स्वत:च्या मूलभूत आणि नैसर्गिक स्वातंत्र्याची जाणीवही नसते. ही अतिशय दुखद गोष्ट आहे. याचीच प्रचीती पुन्हा एकदा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने घेतलेल्या एका सर्व्हेमधून दिसून आली.
पुरुषांनी स्त्रियांना मारणं कितपत योग्य आहे? या प्रश्नावर भारतातील 18 राज्यांमध्ये सर्व्हे घेण्यात आला. यापैकी तेलंगणा मध्ये 83.8% महिलांनी पुरुष स्त्रीला मारतात हे योग्य आहे असे म्हटले आहे. तर या हिमाचल प्रदेशमध्ये फक्त 14.8% टक्के लोकांनी याबाबत सहमती दर्शवली आहे. पुरुषांमध्ये केलेल्या सर्व्हेत कर्नाटकमधील 81.9% टक्के पुरुषांनी याला सहमती दर्शवली आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये हेच प्रमाण 14.2% इतके पाहायला मिळाले.
महिला सुरक्षा : राजस्थान मध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार तर तामिळनाडूमध्ये नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून १६ वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
वरील आकडेवरीवरून तुम्हाला साफ लक्षात येईल की, स्त्रियाच या गोष्टीला सहमती दर्शवतात की पुरुषांनी त्यांना मारणं योग्य आहे. हे मन विचलित करणारं आहे.
हा सर्व्हे करण्यासाठी सात प्रश्न/सात परिस्थिती ठेवल्या होत्या. प्रश्न असा होता की, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये पुरुषाने स्त्रीला मारणे योग्य आहे? 1. जर स्त्री पुरुषाला न सांगता घराबाहेर गेली. 2. जर तिने आपल्या घराची काळजी घेतली नाही आणि मुलांकडे दुर्लक्ष केले. 3. जर स्त्री पुरुषासोबत भांडत असेल. 4. जर स्त्रीने पुरुषांसोबत सेक्स करण्यास नकार दिला. 5. जर स्त्रीने जेवण व्यवस्थित बनवले नाही. 6. जर ती त्याच्यासोबत अप्रामाणिक राहते. 7. जर ती आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेत नाही.
वरील सात परिस्थितीनपैकी स्त्रियांनी जास्तीत जास्त मतदान केलेली परिस्थिती होती, “जेव्हा स्त्री आपल्या सासू सासऱ्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही” तेव्हा पुरुषाने तिला मारणे योग्य आहे. दुसरा नंबर येतो, “जेव्हा स्त्री आपल्या घराची काळजी घेत नाही आणि आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करते” अशा दोन परिस्थितीमध्ये पुरुषांनी स्त्रियांना मारणे अतिशय योग्य आहे असे ‘स्त्रीयांनीच’ सांगितले आहे.
गुजरात, गोवा, बिहार, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि वेस्ट बंगाल या राज्यांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला होता. या सर्व्हेमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार बऱ्याच राज्यांमधील स्त्रियांनीच ही गोष्ट जस्टिफाय केली आहे.
2015-16 मध्ये देखील असाच एक सर्व्हे घेण्यात आला होता. त्यावेळी देखील 52 टक्के महिलांनी पुरुष तिला मारतात ही गोष्ट जस्टिफाय केली हाेती. तर 42 टक्के पुरुषांनी ही गोष्ट जस्टिफाय केली हाेती. ह्या आकडेवारी वरून ही गोष्ट सिद्ध होतेय की स्त्रिया स्वतःला होणारी घरेलू हिंसा जस्टीफाय करताहेत.
डिरेक्टर ऑफ पॉप्युलेशन फर्स्ट आणि एका एनजीओ मध्ये स्त्री हक्कांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा ए एल यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले की, स्त्रियांच्या मनामध्ये पितृसत्ताक समाज पध्दतीची मुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की त्यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, आपले स्त्रीपण याची जाणीव देखील नसते. ह्या गोष्टी दूर व्हायला बराच कालावधी जावा लागेल.
कालच उत्तर प्रदेश मध्ये घरेलू हिंसेमुळे एका तरुणीचा मृत्यू घरातील लोकांसमोरच झाला. अश्या एक ना अनेक घटना रोज घडत असतात. बातम्यांमध्ये येणाऱ्या घटना आपल्याला कळतात. बऱ्याच घटना ज्या माहीत नाहीत, त्यांचे काय? असं म्हणतात की अन्याय करणारा वाईट असतोच पण त्यापेक्षाही मोठाच चुकीचा तो ठरतो जो अन्याय सहन करतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App