प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकिकडे काँग्रेस ईडी आणि अन्य तपास यंत्रणांविरोधात उद्या देशभर आंदोलनाच्या पवित्र्यात आली असताना नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीला हवाला लिंक सापडल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल हेराल्ड आणि संबंधित संस्थांमध्ये हा हवाला व्यवहार झाल्याची माहिती असून यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानतंर ईडी नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. Havala link found; Sonia, Rahul Gandhi again in the round of ED investigation
याशिवाय ईडी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी करणार आहे. बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे नॅशनल हेराल्ड त्याच्या संलग्न कंपन्या आणि तिसऱ्या गटात हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले असल्याचा दावा ईडीच्या सूत्रांनी केला आहे.
दिल्लीत असणाऱ्या हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीत ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये सापडले आहेत. यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी मोठी कारवाई करणार असून ही कारवाई काय असणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
– सोनिया-राहुल यांची ईडी फेरतपासणी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने 21 जुलै रोजी 3 तास, 26 जुलै रोजी 6 तास आणि 27 ऑगस्ट रोजी 3 तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारले होते. ईडीने जूनमध्ये 5 दिवसांत राहुल गांधींची 50 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. या चौकशीत सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडियाकडून कोणताही लाभ घेतला नसल्याचे सांगितले होते. यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर, ईडी दोघांचीही उत्तरे समाधानकारक नसल्याने या उत्तरांची ईडी पुन्हा छाननी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App