Haryana Corona Guidelines: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हरियाणा सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

गेल्या काही आठवड्यांमध्ये हरियाणामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, हरियाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. हरियाणाच्या आरोग्य विभागाने शनिवारी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हे सांगण्यात आले आहे. Haryana Govt makes wearing face masks mandatory in public places

निवेदनात म्हटले आहे की, हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३ एप्रिल रोजी एक बैठक झाली आहे. असे आढळून आले आहे की, गेल्या काही आठवड्यांमध्ये हरियाणामध्ये कोविड-19 संसर्गाच्या पॉझिटिव्हिटीच्या दरात वाढ होऊन कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या संसर्गापासून बचावाचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या सार्वजनिक ठिकाणी लोकसंख्या १०० पेक्षा जास्त आहे, सरकारी कार्यालये, मॉल्स इत्यादी ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असेल.

या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पंचायतींना देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवृत्त करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान शुक्रवारी हरियाणामध्ये कोरोनाची ४०७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. हरियाणा हेल्थ बुलेटिननुसार, गुरुग्राममध्ये सर्वाधिक २०६ प्रकरणे आढळून आली आहेत. दुसरीकडे, राज्यात गेल्या आठवड्यात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू यमुनानगर जिल्ह्यात मंगळवारी झाला, तर दुसऱ्याचा गुरुवारी गुरुग्राममध्ये मृत्यू झाला.

Haryana Govt makes wearing face masks mandatory in public places

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात