वृत्तसंस्था
चंडीगड : काँग्रेसमध्ये राजकीय पेचप्रसंगातून सावरण्याची शक्ती उरलेली नाही. पंजाबमध्ये जे झाले, तेच येत्या काही दिवसांत तुम्हाला छत्तीसगड आणि राजस्थानात दिसेल, असा टोला हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसला लगावला आहे. Haryana Deputy CM Dushyant Chautala slammed the Congress, Says What happened in Punjab will soon be seen in Chhattisgarh and Rajasthan
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले पण काँग्रेसमधली गटबाजी संपलेली नाही. उलट तिथे आता मंत्रीपदावरून नवीन गटबाजी सुरू झाली आहे, याकडे दुष्यंत चौटाला यांनी लक्ष वेधले.
जे पंजाबचे तेच छत्तीसगड आणि राजस्थानचे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात मंत्री टी. एस. सिंगदेव बंडाच्या उघड पवित्र्यात आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मकराम हे देखील मध्येच नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे छत्तीसगडमध्ये येत्या काहीच दिवसांत काँग्रेसमध्ये विविध गटांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल, असे भाकित दुष्यंत चौटाला यांनी वर्तविले.
One can see turmoil in Chhattisgarh shortly. Looking at Punjab's situation, it may also be seen in Rajasthan. It'll be last few steps towards Congress' end. Party who doesn't trust its leadership, can't take steps for country's development: Haryana Dy CM Dushyant Chautala (25.09) pic.twitter.com/aXeDOwqoqz — ANI (@ANI) September 25, 2021
One can see turmoil in Chhattisgarh shortly. Looking at Punjab's situation, it may also be seen in Rajasthan. It'll be last few steps towards Congress' end. Party who doesn't trust its leadership, can't take steps for country's development: Haryana Dy CM Dushyant Chautala (25.09) pic.twitter.com/aXeDOwqoqz
— ANI (@ANI) September 25, 2021
राजस्थानात बंडखोर नेते सचिन पायलट यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचा राजकीय समझोता झालेला नाही. राहुल गांधींना भेटून त्यांनी आपल्याला देऊ करण्यात आलेली प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याचे समजते. परंतु, राहुल गांधी यांच्या मनात छत्तीसगड आणि राजस्थानात फेरबदल करण्याचे घाटत आहे, अशी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दुष्यंत चौटाला यांनी जे पंजाबमध्ये झाले, तेच तुम्हाला लवकरच छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये दिसेल, असे वक्तव्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App