विशेष प्रतिनिधी
इंदूर : हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषण आता प्रत्यक्षा येणार आहे. कारण इंदूर येथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भाजपचे ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष आणि सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली आहे. आपल्या दुकानातून या मूर्त्यांची विक्री करण्याचा वर्मा यांचा मानस आहे.Har Har Modi, Ghar Ghar Modi, sale of silver idols of the Prime Minister in Indore
वर्मा यांनी याआधीही आपल्या दुकानातून मोदींचा फोटो असलेल्या चांदीच्या नोट आणि नाणी विक्री केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५० ग्रॅम मूतीची किंमत ११ हजार रुपये निधार्रीत करण्यात आलीय. या मूर्त्या वेगवेगळ्या हावभावात आणि वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत दिसून येत आहेत. वर्मा यांच्याकडे सध्या दोन मूर्त्या पोहचल्या आहेत. पाच लवकरच दाखल होणार आहेत.
मुंबईच्या एका मोठ्या ज्वेलर्स शोरुमवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्त्या पाहिल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीच्या मूर्त्या बनवण्याची ऑर्डर दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्त्या पाहण्यासाठी वर्मा यांच्या दुकानासमोर सध्या प्रचंड गर्दी दिसून येतेय.
इंदूरच्या जुन्या राजमोहल्ला भागात राहणारे वर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च स्थानी मानतात. आपल्या दुकानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसहीत नाणी आणि नोटांची विक्री ते आपल्या दुकानातून करत आहेत.
‘घर घर मोदी मोहिमेत आपला हातभार लागावा’, अशी त्यांची इच्छा आहे. वाढदिवस किंवा विवाह प्रसंगी उपस्थिती लावल्यास वर्मा लोकांना मोदींच्या फोटोसहीत चांदीची नाणी आणि नोटा भेट म्हणून देतात. बाजारात याअगोदर मोदी जॅकेट आणि मोदी कूर्ता यांची फॅशन पाहायला मिळाली होती. या कपड्यांची जोरदार खरेदीही मोदींच्या चाहत्यांकडून केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App